Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता घरबसल्या पाहता येणार 'अवतार: फायर अँड ॲश', कधी व कुठे प्रदर्शित होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:07 IST

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर 'अवतार: फायर अँड ॲश' आता OTT वर; जाणून घ्या कुठे पाहता येईल

Avatar: Fire and Ash : हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांची 'अवतार' ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट फ्रँचायझी आहे. पहिला भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला आणि दुसरा भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर' २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर 'अवतार: फायर अँड ॲश' हा २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या दोन भागांप्रमाणेच तिसऱ्या भागालाही  प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता थिएटर रिलीजच्या जवळपास सहा महिन्यांनंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची घोषणा करण्यात आली आहे.

सामान्यतः एखादा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ४५ ते ६० दिवसांत OTT वर येतो. मात्र काही मोठे चित्रपट निर्माते अनेक महिने थांबूनच डिजिटल रिलीज करतात. 'अवतार: फायर अँड ॲश' थेट  पाच महिन्यानंतर ओटीटीवर येतोय. १९ डिसेंबर २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेला हा चित्रपट जून महिन्यात OTT वर येणार आहे.

मेकर्सनी १३ मे रोजी अधिकृत घोषणा करत सांगितले की, 'अवतार: फायर अँड ॲश' हा चित्रपट २४ जून २०२६ पासून Disney+ अर्थात जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला नाही, त्यांना आता घरबसल्या हा अनुभव घेता येणार आहे.


English
हिंदी सारांश
Web Title : 'Avatar: Fire and Ash' Home Release Date Announced!

Web Summary : James Cameron's 'Avatar: Fire and Ash,' following its successful theatrical run, will be available on Disney+ and Jio Hotstar from June 24, 2026. This allows viewers to experience the film at home after its cinema release.
टॅग्स :हॉलिवूड