‘मिशन इम्पॉसिबल ६’ची प्रदर्शन तारीख घोषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:23 IST
हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रुझ सहाव्यांदा इथन हंट या स्मार्ट स्पायच्या भूमिकेत परतणार आहे. ‘एमआय’ सिरीजमधील सहावा चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल ...
‘मिशन इम्पॉसिबल ६’ची प्रदर्शन तारीख घोषित
हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रुझ सहाव्यांदा इथन हंट या स्मार्ट स्पायच्या भूमिकेत परतणार आहे. ‘एमआय’ सिरीजमधील सहावा चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल ६’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. टॉम क्रुझला गुप्तहेराच्या रुपात पाहण्यासाठी चाहत्यांना २७ जुलै, २०१८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.गेल्या वर्षी प्रदर्शित ‘मिशन इम्पॉसिबल : रोग नेशन’ या चित्रपटावेळीच टॉमने आणखी एका भाग काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. ५४ वर्षीय टॉम म्हणाला होता की, ‘पुढचा चित्रपटात अधिक भव्य, जबरदस्त स्टंट्स आणि इंटरटेंनिंंग स्टोरी पाहायला मिळेल.’ त्याचा हा दावा सिनेमा आल्यावरच कळेल की, किती खरा आणि किती फुसका आहे.जेम्स बाँड, जेसन बॉर्न आणि ईथन हंट हे सिनेजगतातील प्रसिद्ध गुप्तहेर. टॉम क्रुझने आतापर्यंत पाच मिशन इम्पॉसिबल चित्रपटांतून काम केलेल आहे. या सिरीजने सर्व मिळून २.८ बिलयन डॉलर्सचा (१८.६ हजार कोटी रु) गल्ला जमवलेला आहे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता निर्मात्यांना पुन्हा एका ईथन हंटला नव्या मिशनवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.