Join us

जगातील ही सुंदर अभिनेत्री पडली चक्क स्वत:च्या बॉडीगार्डच्या प्रेमात, सहा मुलांची आहे ती आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 19:59 IST

जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिला ओळखली जाते.

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीला जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. अँजेलिनाने लुकिंग टू गेट आऊट सिनेमातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. अँजेलिना तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत राहिली. अँजेलिनाने पहिलं लग्न 28 मार्च 1996 साली जॉनी ली मिलरसोबत केले. मात्र 3 फेब्रुवारी 1999 साली दोघांचा घटस्फोट झाला.

यानंतर तिने अमेरिकन अभिनेता बिली बॉब थार्नटनसोबत दुसरं लग्न केले मात्र 2003 मध्ये हेही नातं संपुष्टात आलं. ब्रॅड पिटसोबत ती नात्यात होती मात्र तिचं हे नातं ही फार काळ टिकलं नाही. ब्रॅड पिट आणि अँजेलिना ही एकेकाळीची सगळ्यात लोकप्रिय जोडी होती. 2 वर्षानंतर ब्रॅड आणि अँजेलिना वेगळे झाले. 

मीडिया रिपोर्टनुसार अँजेलिना आपल्या हँडसम बॉडीगार्डला डेट करते आहे. बॉडीगार्ड आणि अँजेलिनची जवळीक गेल्या वर्षभरापासून वाढते आहे. अँजेलिनाच्या या अफेअरच्या बातम्यांमुळे ब्रॅड पिट फारसा खुश नाही आहे. अँजेलीना जोली तिच्या   बॉडीगार्डवर खरे प्रेम झाले आहे आणि आता त्यांना एकमेकांपासून दूर राहणे पसंत नाही. अँजेलिना चार मुलांची आई आहे आणि दोन मुलं तिने दत्तक घेतली आहेत. 

टॅग्स :अँजोलिना जॉली