Join us
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षीय प्रसिद्ध गायिका कधीच होऊ शकत नाही आई! भावुक होत म्हणाली, "हे सत्य समजल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:10 IST

एका प्रसिद्ध गायिकेने आई होणार नसल्याचा खुलासा केला आहे. यामागचं कारणंही तिने सांगितलं आहे.

गेल्या काही महिन्यांत सिनेसृष्टीतून अनेक गुडन्यूज मिळाल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. दीपिका आणि रणवीरला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. पण, एका प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीच्या नशिबी मात्र आई होण्याचं सुख नसल्याचा खुलासा तिने केला आहे. ही सुप्रसिद्ध गायिका म्हणजे अमेरिकन सिंगर, अभिनेत्री सेलेना गोमेज आहे. 

सेलेना तिच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. ३२ वर्षीय सेलेनाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. कधीच बाळाला जन्म देऊ शकत नसल्याचा खुलासा सेलेनाने एका मुलाखतीत केला आहे. याबरोबरच तिने यामागचं कारणही सांगितलं आहे. सेलेनाने व्हॅनिटी फेयरला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आई होण्याबाबत भाष्य केलं. तसंच हे सत्य समजल्यानंतरच्या कठीण काळाबद्दलही सेलेनाने या मुलाखतीत सांगितलं. 

"मी यापूर्वी हे कधीच बोलले नाही. पण, मी कधीच माझ्या स्वत:च्या मुलाला जन्म देऊ शकत नाही. मी अनेक आजारांचा सामना करत आहे. त्यामुळे माझ्या आणि माझ्या बाळाच्याही जीवाला धोका होऊ शकतो. हे सत्य समजल्यानंतर अनेक दिवस मी दु:खी होते", असं सेलेनाने सांगितलं. याबरोबरच सरोगसी किंवा दत्तक मूल घेऊन आई होण्याच्या पर्यायाचाही विचार करत असल्याचं सेलेना म्हणाली. "मी याचा कधीच विचार केला नव्हता. पण, सरोगसी आणि मूल दत्तक घेण्याचे पर्याय माझ्याकडे आहेत", असंही सेलेना म्हणाली.  

सेलेना गेल्या काही काळापासून ल्यूपस या गंभीर आजाराचा सामना करत आहे. याबाबत तिने भाष्यही केलं होतं. हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये इम्यून सिस्टिम आपल्याच टिश्यूजवर अटॅक करते. यामुळे सेलेनाना किडनी ट्रान्सप्लांटगी करावं लागलं होतं. 

टॅग्स :सेलेना गोमेझसेलिब्रिटी