Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अली फजल गिरवतोय जुडी डेंचकडे अ‍ॅक्टिंगचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 13:38 IST

ज्या कलाकाराकडे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ ५९ वर्षांचा अनुभव असेल, त्याच्याकडून कोणाला शिकावेसे वाटणार नाही? म्हणून तर अलि ...

ज्या कलाकाराकडे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ ५९ वर्षांचा अनुभव असेल, त्याच्याकडून कोणाला शिकावेसे वाटणार नाही? म्हणून तर अलि फजल सध्या जुडी डेंच या अभिनेत्रीकडून अभिनयातील बारकावे शिकण्याची एकही संधी गमावू इच्छित नाही.तो सध्या ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या हॉलीवूड चित्रपटाच्या शूटींगसाठी गेले महिनाभर युरोपमध्ये आहे. या सिनेमात तो जुडी डेंचसोबत काम करत आहे. त्यामुळे तिच्याकडून जेवढे जास्त शिकता येईल तेवढे शिकण्याचा तो प्रयत्न करीत आहेत. भारतीय प्रेक्षकांसाठी ‘बॉण्ड’ चित्रपटातील ‘एम’ या भूमिकेसाठी जुडी प्रसिद्ध आहे.आॅस्कर आणि गोल्डन ग्लोब यांसारख्या पुरस्करांवर आपली मोहर उमटवलेल्या जुडीचे मार्गदर्शन घेण्यासाठी अली सेट आणि बाहेरदेखील तिच्यासोबत वेळ घालवत आहे. जुडी म्हणजे अ‍ॅक्टिंगची चालतीबोलती कार्यशाळाच! विशेष म्हणजे या ‘फुकरे’ स्टारचा शिकण्याप्रती उत्साह पाहून तीदेखील प्रभावित झाली आहे.                                                                      द डेम : जुडी डेंचसुत्रांनुसार जुडी स्वत:च्या व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढून अलीसोबत चर्चा करत असते. संवाद कसे बोलावे, शब्दांमागाचा अर्थ कसा ओळखावा, व्यक्तिरेखेतील विविध कांगोरे कसे उजागर करावेत याविषयी ती त्याला सांगत असते.