मनोरंजन सृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मॉडेल बारबरा पेल्विन आणि तिचा पती आणि अभिनेता डायलन स्प्राऊस हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाची आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ (Cannes 2026) च्या रेड कार्पेटवर या जोडप्याने ही घोषणा केली. यासोबतच बारबराने सोशल मीडियावर एक खास पोस्टही शेअर केली आहे.
कान्स २०२६ मधील घोषणा
गुरुवारी बारबरा आणि डायलन कान्सच्या रेड कार्पेटवर एकत्र दिसले. बारबराने निळ्या रंगाचा सॅटिन गाउन परिधान केला होता, ज्यामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. डायलन सुटाबुटातील खास अंदाजात अतिशय देखणा दिसत होता. रेड कार्पेटवर फोटो काढताना या जोडप्याने बारबराच्या बेबी बंपला प्रेमाने स्पर्श करत आपल्या गरोदरपणाची अधिकृत घोषणा केली.
बारबराने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर बाळाच्या सोनोग्राफीचा फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टनंतर जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
बारबरा आणि डायलन यांची पहिली भेट २०१७ मध्ये एका पार्टीत झाली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचं बोलणं सुरू झालं. २०१८ मध्ये डायलन चीनमध्ये शूटिंग करत असताना बारबरा त्याला भेटायला तिथे गेली होती. जून २०१८ मध्ये त्यांनी आपले नाते सर्वांसमोर जाहीर केले. जानेवारी २०१९ मध्ये हे जोडपे एकत्र राहू लागले आणि जुलै २०२३ मध्ये हंगेरीमधील बुडापेस्ट येथील एका चर्चमध्ये त्यांनी विवाह केला. लग्नानंतर साधारण तीन वर्षांनी, मे २०२६ मध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची घोषणा केली आहे.
Web Summary : Dylan Sprouse and Barbara Palvin announced they are expecting their first child after four years of marriage at the Cannes Film Festival 2026. The model shared the news on Instagram with a baby sonogram, sparking congratulatory messages.
Web Summary : डायलन स्प्राउस और बारबरा पाल्विन ने कान्स फिल्म फेस्टिवल 2026 में शादी के चार साल बाद अपने पहले बच्चे की उम्मीद करने की घोषणा की। मॉडल ने इंस्टाग्राम पर बच्चे के सोनोग्राम के साथ खबर साझा की, जिससे बधाई संदेशों की बाढ़ आ गई।