Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्रा काय ऐकत नाय! एकीकडे 'वाराणसी' सिनेमाची चर्चा असताना अभिनेत्रीच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:04 IST

प्रियंका चोप्राला नव्या प्रोजेक्टची ऑफर; हॉलिवूडच्या 'या' दिग्गज अभिनेत्यासोबत करणार काम

Priyanka Chopra Upcoming Film: बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा सध्या भलतीच फॉर्ममध्ये आहे. हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर अभिनेत्रीने हॉलिवूडमध्ये बस्तान मांडलं आहे.अलिकडेच प्रियंका 'सिटाडेल २' या सीरिजमुळे चर्चेत आली होती. लवकरच ती दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या 'वाराणसी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच प्रियांकाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. एकीकडे 'वाराणसी' या चित्रपटामुळे चर्चेत असणाऱ्या प्रियांकाला एका हॉलिवूड प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ‘ऑरलॅंडो ब्लूम’ सोबत ती काम करताना दिसणार आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, प्रियंका चोप्राची मॅट स्मक्लर दिग्दर्शित आगामी  'रिसेट'या सिनेमात वर्णी लागली आहे. या चित्रपटाचे नाव 'रिसेट' आहे. हा एक सर्व्हायव्हल थ्रिलर आहे.प्रियंकाने स्वतः इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत  तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर दिली आहे.तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती मिळताच चाहते प्रचंड उत्सुक असून त्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.


'रिसेट' या चित्रपटाचं शूटिंग ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. प्रियांका चोप्रा या चित्रपटात केवळ अभिनयच करणार नाही, तर ती या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे.त्यामुळे हा प्रोजेक्ट प्रियंकासाठी आणखी खास मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra lands new Hollywood project alongside Orlando Bloom: 'Reset'.

Web Summary : Priyanka Chopra, already filming 'Citadel 2' and slated for 'Varanasi', has signed on for the Hollywood thriller 'Reset' with Orlando Bloom. She will also produce the film, set to begin shooting in August.
टॅग्स :प्रियंका चोप्राहॉलिवूडसिनेमा