Join us

शूटिंगदरम्यान सेटवर अभिनेत्याचा झाला अपघात, रुग्णालयात झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 15:15 IST

Godfrey Gao's Death: एका टेलिव्हिजन मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान हा अभिनेता पडला आणि त्याचे निधन झाले.

ताइवानमध्ये जन्मलेल्या अभिनेता व मॉडेल गॉडफ्रे गाओचे चीनमध्ये निधन झाले आहे. ३५ वर्षीय गॉडफ्रे गाओ चीनमध्ये एका रिएलिटी शो चेज मीचं शूटिंग करत होते. या शोमध्ये तो गेस्ट स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. मात्र अचानक असं काही झालं की तो या शोच्या सेटवर पडला. या अपघातामुळे गाओचे निधन झाले. 

हॉस्पिटलच्या सांगण्यावरून गॉडफ्रे गाओला कार्डियक अरेस्टमुळे गाओचं निधन झालं. त्याचे पार्थिव ताइवानला घेऊन जाणार आहेत.

या प्रकरणी चेज मीच्या निर्मात्याने सांगितलं की, सेटवर शूटिंग चालू होते. सेटवर अचानक गाओ खाली कोसळला. ज्यामुळे तो बेशुद्ध पडला. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचे निधन झाले. २०११ साली लक्झरी ब्रॅण्ड लुई विटॉनच्या जाहिरातीसाठी निवड झालेल्या पुरूषांमध्ये गाओ पहिला एशियाई पुरूष मॉडेल होता. त्यानंतर त्याने हॉलिवूडमध्ये त्याची ओळख बनवली. 'द मोर्टल इंस्ट्रूमेंट्स: सिटी ऑफ बोन्स'मध्ये गाओने अभिनय केला आहे. गाओ चीनमधील प्रचलित नाव आहे.

टॅग्स :चीन