गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड स्टार टॉम क्रूझच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. ६३ वर्षीय टॉम क्रूझ वयाने २६ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. त्यांचे काही फोटोही समोर आले होते. आता पुन्हा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपवर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
टॉम क्रूझ स्पॅनिश अभिनेत्री एना डे हिला डेट करत आहे. एना ही ३७ वर्षांची असून टॉम आणि तिच्यात २६ वर्षांचं अंतर आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघेही कॅज्युएल लूकमध्ये दिसत आहे. शॉपिंग करताना आणि रस्त्यांवर फिरतानाचे त्यांचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. ते रोमँटिक डेटवर गेल्याचंही बोललं जात आहे. पण, अद्याप टॉम किंवा एनाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी त्यांचं रिलेशनशिपही ऑफिशियल केलेलं नाही.
टॉम आणि अना यांची पहिली भेट या वर्षी अर्थात २०२५ मध्ये फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या आधी झाली. यानंतर मार्चमध्ये दोघांना लंडन हेलिपोर्टमध्ये हेलिकॉप्टरने ये-जा करताना पाहण्यात आलं. टॉमने स्वतः हेलिकॉप्टर उडवून एना आणि त्यांच्या टीमला हेलिपॅडवर उतरवले होते. पुढे एप्रिलमध्ये अनाच्या जन्मदिनी हे दोघं पार्कमध्ये एकत्र चालताना दिसून आले. मे महिन्यात हे दोघे फूटबॉल स्टार डेव्हिड बेकहमच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत सुद्धा एकत्र उपस्थित होते. आता पुन्हा ते स्पॉट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.