Join us
Daily Top 2Weekly Top 5

हितेन तेजवानी या मालिकेद्वारे बदलणार आपली इमेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 07:15 IST

बालाजी टेलिफिल्मसचे हे त्याचे दुसरे कुटुंबच आहे. या कुटुंबात परतताना &TVच्या 'डायन' या मालिकेत हितेन तेजवानी चक्क नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

ठळक मुद्देकलाकार म्हणून वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याकडे माझा कल असतो. आजवर मी नेहमीच सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. माझी 'गुड बॉय इमेज' असल्याने मला नेहमीच याप्रकारच्याच भूमिका ऑफर करण्यात आलेल्या आहेत. पण आता मी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

हितेन तेजवानीने कुटुंब, कसौटी जिंदगी की, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याची पत्नी गौरी प्रधान देखील अभिनेत्री असून त्याच्यासोबत अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे. छोट्या पडद्यावरचा चॉकलेट हिरो अशी त्याची ओळख आहे. त्याचे खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव याला साजेशा भूमिकाच त्याला नेहमी मिळत आलेल्या आहेत. पण आता ही 'गुड बॉय' इमेज बदलण्याचा हितेन प्रयत्न करणार आहे. हितेन अनेक वर्षांनंतर बालाजी टेलिफिल्म्ससोबत काम करणार असून यावेळी प्रेक्षकांसाठी तो एक नवे सरप्राइज घेऊन येणार आहे.  बालाजी टेलिफिल्मसचे हे त्याचे दुसरे कुटुंबच आहे. या कुटुंबात परतताना &TVच्या 'डायन' या मालिकेत हितेन तेजवानी चक्क नकारात्मक भूमिका साकारणार आहे. अशी भूमिका साकारण्याचे त्याचे बऱ्याच काळापासूनचे स्वप्न होते. कथानकानुसार आता डायनचे सर्व प्रयत्न मोडीत काढण्यासाठी जान्हवी मौर्य (टिना दत्ता) तिच्यासारख्याच दिसणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री कुंदनी रॉय हिच्यासोबत आपल्या व्यक्तिमत्त्वाची अदलाबदल करणार आहे. मात्र, यामुळे आपल्या आयुष्यात अधिक संकटे निर्माण होतील, याची तिला कल्पनाच नाहीये. यामुळे जान्हवीच्या वैवाहिक आयुष्यातील तणाव आणखीच वाढणार असून आपल्या पत्नीशी पुन्हा नाते प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेला कुंदनी रॉयचा नवरा विराज (हितेन तेजवानी) जान्हवीच आपली पत्नी असल्याचे सांगणार आहे तर आकर्षही (मोहित मल्होत्रा) आपल्या प्रेमासाठी लढणार आहे. आपले गुपित उघड होऊ नये यासाठी जान्हवीला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

या भूमिकेविषयी हितेन तेजवानी सांगतो, "कलाकार म्हणून वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याकडे माझा कल असतो. आजवर मी नेहमीच सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. माझी 'गुड बॉय इमेज' असल्याने मला नेहमीच याप्रकारच्याच भूमिका ऑफर करण्यात आलेल्या आहेत. पण आता मी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. व्यक्तिरेखेला काहीशी ग्रे शेड असलेल्या भूमिका मी याआधी केल्या आहेत. मात्र, आताची ही भूमिका पूर्णपणे नकारात्मक आहे. अर्थातच या भूमिकेसाठी मला अधिक मेहनत घ्यावी लागली. हे माझ्यासाठी फारच मोठं आव्हान होतं. पण, हा माझ्यासाठी अगदी नवा अनुभव होता आणि मी यासाठी अनेक वर्षं वाट पाहिली आहे. माझ्या व्यक्तिरेखेमुळे येणारं नवं वळणही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. 

टॅग्स :हितेन तेजवानी