Join us

"अत्यंत हृदयद्रावक...", बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर अभिनेत्री रुपाली गांगुलीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:34 IST

RCB च्या विजयामुळे कर्नाटकात मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र, या विजयी सोहळ्याला गालबोट लागलं आहे.

Bengaluru stampede : यंदाच्या आयपीएल २०२५ या स्पर्धेत १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने आयपीएल विजेतेपदाचा खिताब पटकावला. (Royal Challengers Bangalore) च्या विजयामुळे कर्नाटकात मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र, या विजयी सोहळ्याला गालबोट लागलं आहे. आरसीबीच्या विजयी परेडदरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला आहे तर ३० हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आता या दुर्घटनेवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आता या घटनेवर टीव्ही अभिनेत्री अनुपमा फेम रुपाली गांगुलीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत दुख व्यक्त केलं आहे. 

बंगळुरूमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेवर राजकीय मंडळींसह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत. चेंगराचेंगरीच्या या दुर्घटनेवर अभिनेत्री रुपाली गांगुलीने एक्सवर पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्यात. "चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घडलेली घटना अत्यंत हृदयद्रावक आहे या घटनेमुळे मी पूर्णपणे अस्वस्थ आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. तसेच या घटनेत जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते." अशी भावुक पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. 

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक लोक जखमी झालेत. या संपूर्ण घटनेचा १५ दिवसांत मॅजिस्ट्रेट तपास करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धाराम्मैया यांनी दिलेत. स्टेडियमची क्षमता ३५ हजार लोकांची होती परंतु या कार्यक्रमासाठी २-३ लाख लोक आले होते असं मुख्यमंत्र्यांनी सांगत मृतांच्या वारसांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.दरम्यान, या दुर्घटनेत अनेक जण जखमी झालेत. स्टेडियम खचाखच भरले होते. त्यामुळे आम्ही परत जात होतो परंतु आम्हाला मागे जाण्याची परवानगी दिली नाही. गेटवर लोकांची प्रचंड गर्दी झाली. जरी पोलिसांनी गेट उघडला असता तरीही मोठ्या संख्येमुळे चेंगराचेंगरी झाली असती असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

टॅग्स :बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीटिव्ही कलाकारआयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर