टिव्ही अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेत हिनाने केवळ काही दिवसांसाठी कमोलिकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर हिनाकडे वेळ नसल्यामुळे तिने ही मालिका सोडली. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार हिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. हिना लवकरच विक्रम भटच्या सिनेमात झळकणार आहे. हिना खान यात मुख्य भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या पहिल्या शूटिंगचे शेड्यूल पूर्ण केले आहे. यात ती एक फॅशन डिझायनरची भूमिका साकारणार आहे.
मुहूर्त ठरला ! एकता कपूरची ही अभिनेत्री करणार विक्रम भटच्या सिनेमातून डेब्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:21 IST
एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेत काही दिवसांसाठी ही अभिनेत्री झळकली होती.
मुहूर्त ठरला ! एकता कपूरची ही अभिनेत्री करणार विक्रम भटच्या सिनेमातून डेब्यू
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}