Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिना खानला कॅन्सर झाल्याचं समजताच धीर द्यायला आली महिमा चौधरी, म्हणाली- "तू फायटर आहेस आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 16:10 IST

टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिने तिला धीर देत तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. 

टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. हिनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली. ३६ वर्षीय हिनाला स्टेज ३ चा ब्रेस्ट कॅन्सर आहे. हिनाला कर्करोग झाल्याचं समजताच चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. हिनाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिने तिला धीर देत तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. 

हिना खानने शुक्रवारी ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं पोस्टमधून सांगितलं. "माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या चाहत्यांबरोबर मला एक बातमी शेअर करायची आहे. मला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. मी स्ट्राँग आहे आणि आजारातून बरी होणार आहे. यावर मी उपचार घेत असून यातून पूर्णपणे बरी होण्यासाठी मी सगळं काही करायला तयार आहे. या काळात मला थोडी प्रायव्हसी हवी आहे. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि ताकदीची मला पूर्ण जाणीव आहे. या प्रवासातून जाताना मला तुमचे अनुभव आणि पाठिंब्याचा नक्कीच उपयोग होईल. मी माझ्या कुटुंबीयांबरोबर सकारात्मक राहीन. यातून मी पूर्णपणे बरी होईन याचा मला विश्वास आहे. तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि आशीर्वादांची मला गरज आहे," असं हिनाने पोस्टमध्ये म्हटलं होतं. 

हिनाच्या या पोस्टवर महिमा चौधरीने कमेंट करत तिला धीर दिला आहे. "मी तुला माझं प्रेम आणि ताकद पाठवत आहे. तू धाडसी आहेस, हिना. तू फायटर आहेस आणि तू यातून बरी होशील. अनेक लोक तुझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. आणि या प्रवासात मी तुझ्यासोबत आहे", असं महिमा चौधरीने कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

२०२२ मध्ये महिमा चौधरीला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. उपचार घेत महिमा चौधरीने कर्करोगावर पूर्णपणे मात केली आहे. हिना खानचा कर्करोगावर उपचार घेत आहे. 

टॅग्स :हिना खानमहिमा चौधरीकर्करोगसेलिब्रिटी