Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मैत्रिणीशीच हिमेश रेशमियाने थाटला दुसरा संसार,एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे होता चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:13 IST

कित्येक वर्ष हिमेश सोनियासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला होता. सोनिया कपूरही टीव्ही अभिनेत्री असून तिने काही सिनेमांमध्येही काम केले आहे. सोनियाने आतापर्यंत ‘कभी कभी’, ‘कुसुम’, ‘कभी हां, कभी ना’, ‘परिवार’ आणि ‘कैसा ये प्यार है’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

23 जुलै 1973 रोजी महुवा येथे जन्मलेल्या हिमेशने बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये शानदार संगीत देत आपले एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्‍या’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिमेश रेशमियानं आपल्या करियरची सुरुवात केली होती. ‘आशिक बनाया आपने’, ‘झलक दिखला जा’ अशी सुपरहिट गाणी हिमेश रेशमियाची प्रचंड गाजली होती. आजही हिमेशच्या गाण्यांची जादू कमी झालेली नाही.आज हिमेश जितका त्याच्या करिअरमुळे चर्चेत असतो तितकेच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत असतो.

हिमेश रेशमियाने दुसरे लग्न केले त्यावेळी चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. हिमेशच्या पहिल्या पत्नीचे नाव कोमल आहे. 1995 मध्ये हिमेश आणि कोमलचे लग्न झाले होते. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने कोमलशी पहिले लग्न केले होते. मात्र दोघांचे नाते टिकले नाही. 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगा आहे. त्याचे नाव स्वयं आहे.

हिमेशचे दुसरे लग्न सोनिया कपूरसोबत झाले आहे. विशेष म्हणजे सोनिया ही त्याची पहिल्या पत्नीची खास मैत्रिण होती. हिमेश सोनिया कपूरच्या प्रेमात पडला. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे तो प्रचंड चर्चेत असायचा. हिमेशच्या या प्रेमप्रकरणाविषयी त्यावेळी बरीच चर्चा रंगली होती.याविषयी पहिली पत्नी कोमललाही माहिती होते. मात्र कधीच तिने यावर उघडपणे बोलले नाही. इतकेच काय तर हिमेशच्या दुस-या लग्नानंतरही कोमलने सोनियाला जबाबदार धरले नाही. आमचा घटस्फोट हा आमच्याच खासगी कारणांमुळे झाल्याचे कोमलने सांगितले होते.

कित्येक वर्ष हिमेश सोनियासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला होता. सोनिया कपूरही टीव्ही अभिनेत्री असून तिने काही सिनेमांमध्येही काम केले आहे. सोनियाने आतापर्यंत ‘कभी कभी’, ‘कुसुम’, ‘कभी हां, कभी ना’, ‘परिवार’ आणि ‘कैसा ये प्यार है’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘फरेब’, ‘ऑफिसर’, ‘सत्ता’ या सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.

टॅग्स :हिमेश रेशमिया