Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे कित्येक दिवसांपासून द कपिल शर्मा या शोमधून गायब आहे चंदन प्रभाकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 14:19 IST

द कपिल शर्मा शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये  चंदन प्रभाकर आपल्याला चंदू चायवाला या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चंदनची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चंदन या कार्यक्रमातून गायब झाला आहे.

ठळक मुद्देचंदनने महाशिवरात्रीच्या शुभेच्छा इन्स्टाग्रामद्वारे त्याच्या चाहत्यांना दिल्या होत्या. पण या त्याच्या पोस्टवर लोकांनी त्याला त्याने हा कार्यक्रम सोडला आहे का, चंदू तुम्ही कार्यक्रमात पुन्हा लवकर परता... अशाप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या कार्यक्रमातील गैरहजरीविषयी चंदनने सांगितले आहे की, मला अनेकजण मी द कपिल शर्मा शो २ मध्ये कधी परतणार याविषयी विचारत आहेत. पण सध्याच्या स्क्रिप्टमध्ये माझ्या व्यक्तिरेखेला योग्य जागा नसल्याने मी या कार्यक्रमाचा सध्या भाग नाहीये. 

तुम्हाला माहीत आहे का, २००५ मध्ये सारा अली खान झळकली होती कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा दुसरा भाग सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाच्या शोच्या पहिल्या सिझनप्रमाणे या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगला टिआरपी मिळत आहे. या सिझनमध्ये चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, रोचेल राव यांसारखे पहिल्या सिझनमधील कलाकार तर भारती सिंग, कृष्णा अभिषेक यांसारखे नवीन कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. 

द कपिल शर्मा शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये  चंदन प्रभाकर आपल्याला चंदू चायवाला या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चंदनची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चंदन या कार्यक्रमातून गायब झाला आहे. चंदन सध्या कार्यक्रमात का नाहीये याविषयी त्याचे फॅन्स त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. चंदनने महाशिवरात्रीच्या शुभेच्छा इन्स्टाग्रामद्वारे त्याच्या चाहत्यांना दिल्या होत्या. पण या त्याच्या पोस्टवर लोकांनी त्याला त्याने हा कार्यक्रम सोडला आहे का, चंदू तुम्ही कार्यक्रमात पुन्हा लवकर परता... अशाप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे चंदन कार्यक्रमाचे चित्रीकरण का करत नाहीये याचे कारण त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. आपल्या कार्यक्रमातील गैरहजरीविषयी चंदनने सांगितले आहे की, मला अनेकजण मी द कपिल शर्मा शो २ मध्ये कधी परतणार याविषयी विचारत आहेत. माझ्यावर तुम्ही करत असलेल्या प्रेमासाठी मी तुमचा आभारी आहे. सध्याच्या स्क्रिप्टमध्ये माझ्या व्यक्तिरेखेला योग्य जागा नसल्याने मी या कार्यक्रमाचा सध्या भाग नाहीये. 

कपिल शर्मा आणि चंदन प्रभाकर हे लहानपणापासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. चंदनने द कपिल शर्मा शोच्या आधी कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात देखील कपिलसोबत काम केले होते. तसेच त्याने काही पंजाबी चित्रपटात देखील काम केले आहे. भावनाओ को समझो या हिंदी चित्रपटात देखील तो झळकला होता. पण त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमानेच दिली. त्यामुळे चंदनचे फॅन्स त्याला या कार्यक्रमात चांगलेच मिस करत आहेत. 

 

टॅग्स :द कपिल शर्मा शोचंदन प्रभाकर