Join us
Daily Top 2Weekly Top 5

'झिम्मा २'चा लास्ट डे लास्ट शो! हेमंत ढोमे भावुक, म्हणाला, "सिनेमागृहात ५६ दिवस पूर्ण केल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 10:57 IST

'झिम्मा २'च्या सक्सेसनंतर हेमंत ढोमेने खास पोस्ट शेअर केली आहे. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं. बिग बजेट हिंदी सिनेमांना 'झिम्मा २' ने बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर दिली. सात बायकांच्या रियुनियन ट्रिपची गोष्ट सांगणारा 'झिम्मा २' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. ठिकठिकाणी या सिनेमाचे शोज हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. 'झिम्मा २'च्या सक्सेसनंतर हेमंत ढोमेने खास पोस्ट शेअर केली आहे. 

२४ नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झालेला 'झिम्मा २' तब्बल २ महिने बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला होता. ९ आठवडे बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता झिम्मा २ सिनेमागृहातून बाहेर पडला आहे. 'झिम्मा २'ला दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल हेमंतने पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. "चित्रपटगृहात दोन महिने, म्हणजेच ९ आठवडे, म्हणजेच तब्बल ५६ दिवस पू्र्ण! आज चित्रपटगृहातून तुमची रजा घेताना मन आनंदाने भरुन येतंय...पण समाधानाने आणि प्रचंड अभिमानाने भरलेला हा प्रवास आमच्या कायम लक्षात राहील. तुमचं अमाप प्रेम, तुमची आपुलकी, तुमचा हक्क आणि तुमचा विश्वास हीच 'झिम्मा २'ची सर्वात मोठी कमाई, हेच सर्वात मोठं बक्षीस! हा झिम्मादेखील आपला केलात त्याबद्दल धन्यवाद मंडळी!", असं हेमंतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

"मंडळी, तुमच्यासोबत फर्स्ट डे फर्स्ट शो साजरा केला…आज तुमच्यासोबत आपल्या 'झिम्मा २'चा चित्रपटगृहातला लास्ट डे लास्ट शो पण सेलिब्रेट करतोय!", असंही पुढे हेमंतने म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 'झिम्मा २' हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा'चा सीक्वल आहे. या सिनेमात रिंकू राजगुरू, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, शिवानी सुर्वे, सुहास जोशी, सायली संजीव, निर्मिती सावंत आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी