Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेमा मालिनींना धर्मेंद्र यांच्याशी नाही तर या व्यक्तीशी बालपणासून करायचे होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 13:25 IST

धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून त्यांचे नाव दिलवार ठेवले आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना चांगलेच आवडते. या जोडीने आजवर एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांनी सुरुवातीला शराफत आणि तुम हसीन मैं जवाँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची या चित्रपटातील जोडी प्रेक्षकांना भावल्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली.

हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न व्हायच्याआधी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते. धर्मेंद्र यांना काही केल्या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र आपल्यी पहिल्या पत्नीला सोडणार नसल्याचे त्यांनी लग्नाच्या आधीच हेमा मालिनी यांना सांगितले होते. हिंदू धर्मात दोन लग्न करण्याची परवानगी नसल्याने धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून त्यांचे नाव दिलवार ठेवले आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले.

पण तुम्हाला माहिती आहे का?,  हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्याशी लग्न करायचे नव्हते. त्या आणखी कुणाच्या तरी प्रेमाच अखंड बुडाल्या होत्या. हेमा मालिनी यांना कुणी विचारलं तू कुणाशी लग्न करणार?, यावर त्या त्या व्यक्तिचे नाव सांगायच्या. पण काही त्यांच्या लक्षात आले कि आपण ज्च्याया प्रेमात आहोत तो प्रत्यक्ष भगवान श्री कृष्ण आहेत. हेमा यांचं भगवान श्रीकृष्ण यांच्यावर प्रेमात अखंड बुडाल्या होत्या. त्यानंतर ही श्रीकृष्णावरचे त्यांचे प्रेम कमी झालेले नाही. आजही त्या भगवान श्री कृष्णाच्या परम भक्त आहेत. त्याआजही श्रीकृष्णाची भक्ती तेवढ्याच प्रेमाने करतात. 

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्र