Join us
Daily Top 2Weekly Top 5

“...म्हणून मी सनी देओलच्या लेकाच्या लग्नाला गेले नाही”, हेमा मालिनींनी सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:56 IST

हेमा मालिनींनी सांगितलं नातवाच्या लग्नात उपस्थित न राहण्यामागचं कारण, म्हणाल्या...

बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय फॅमिलींपैकी देओल कुटुंबीय एक आहे. काही दिवसांपूर्वीच देओला कुटुंबीयांच्या घरी लग्नाची धामधुम पाहायला मिळाली होती. बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा लेक करण देओलचं लग्न पार पाडलं. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्याच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल होते. परंतु, लग्नात संपूर्ण देओल कुटुंबीय एकत्र दिसले नाहीत. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी, लेक ईशा देओल आणि अहाना देओल करण देओलच्या लग्नात उपस्थित नव्हत्या. यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. आता हेमा मालिनींनी याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

नातव्याच्या लग्नात उपस्थित न राहण्यामागचं खरं कारण सांगत अखेर याबाबत हेमा मालिनींनी खरं कारण सांगितलं आहे. “आमच्यात काहीतरी बिनसलं आहे, असं लोकांना वाटतं. पण, आम्ही एकत्र आहोत. संपूर्ण देओल कुटुंब आमच्याबरोबर आहे. काही कारणांमुळे आम्हाला लग्नाला जाता आलं नाही. पण, सनी आणि बॉबी नेहमी रक्षाबंधनासाठी आमच्या घरी येतात,” असं हेमा मालिनींनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.

नीतू कपूर यांना सूनबाईचं कौतुक, बेस्ट अभिनेत्री ठरल्यानंतर आलियासाठी केली खास पोस्ट

हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. प्रकाश कौर या पहिल्या पत्नी घटस्फोट न देताच धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी लग्न करत दुसरा संसार थाटला होता. धर्मेंद्र आणि हेमा मालिनींना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.

'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नाही, दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “सिंहगडाच्या लढाईत...”

दरम्यान, करण देओलने द्रिशा आचार्यसह जून महिन्यात लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. मुंबईत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, आमिर खान, सलमान खान हे सेलिब्रिटी उपस्थित होते.

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्रसनी देओलइशा देओल