Join us  

संजिदा शेख आहे सिंगल मदर; लेकीचा सांभाळ करण्याविषयी म्हणाली, 'माझ्या आयुष्यात काय चाललंय हे..'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 11:11 AM

Sanjeeda shaikh: संजिदाने अभिनेता आमिर अली याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, नात्यात दुरावा आल्यामुळे त्यांनी २०२१ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. तेव्हापासून संजिदा तिच्या लेकीचा सांभाळ करत आहे.

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणारी संजिदा शेख (Sanjeeda shaikh) सध्या तिच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही सीरिज नुकतीच रिलीज झाली. या सीरिजमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सातत्याने ती चर्चेत येत आहे. यामध्येच मदर्स डे निमित्त तिची पर्सनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. संजिदा सिंगल मदर असून तिच्या लेकीचा सांभाळ करत आहे.

संजिदाने अभिनेता आमिर अली याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, नात्यात दुरावा आल्यामुळे त्यांनी २०२१ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. तेव्हापासून संजिदा तिच्या लेकीचा सांभाळ करत आहे. संजिदा आणि आमिर यांना सरोगसीच्या माध्यमातून कन्यारत्न प्राप्त झालं होतं. आयरा असं त्यांच्या लेकीचं नाव आहे. या जोडीचा घटस्फोट झाल्यानंतर आयराची कस्टडी संजिदाला मिळाली. एका मुलाखतीमध्ये संजिदाने लेकीच्या संगोपनाविषयी देखील भाष्य केलं होत.

"प्रत्येक लहानसहान गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करुन जगाला माहिती देत बसावं अशा लोकांपैकी मी नाही. किंवा, मग मीडियाला घरी बोलावून माझ्या आयुष्यात काय चाललंय हे सांगत बसावं. माझं मन मोकळं करता यावं अशी जवळची माणस माझ्याकडे आहेत त्यामुळे मला कॅमेराची गरज नाही. माझ्याकडे माझं कुटुंब, माझी आई, माझे भावंडं, असं संजिदा म्हणाली.पुढे ती म्हणते, माझी मुलगी खूप लहान आहे. ती फक्त चार वर्षांची आहे. पण, तिला खूप काही कळतं. तिच्यामुळे मला प्रत्येक गोष्टीसोबत लढायची ताकद मिळते."

दरम्यान, ज्यावेळी संजिदा आणि आमिरचा तलाक झाला त्यावेळी तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनीदेखील तिची साथ सोडली. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयीदेखील भाष्य केलं होतं.

टॅग्स :संजीदा शेखटेलिव्हिजनसिनेमावेबसीरिजसेलिब्रिटीमदर्स डे