Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अरे यांना कोणीतरी आवरा रे", लस घेताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 14:15 IST

सेलिब्रेटींच्या अशा वागण्यावर अनेक कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री आशा नेगीने सेलिब्रेटींचा चांगलाच समाचार घेतला होता.

देशभरात लसीकरण जोरात सुरु आहे. अशात 18 वर्षांवरील अनेक जण लसीकरण करून घेत आहेत. अनेक कलाकार लस घेत असून त्यांचे लसीकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे अनेक सेलिब्रिटींना ट्रोलींगचा देखील सामना कराव लागला आहे. लस घेताना अनेकदा सेलिब्रेटी इतकी नौटंकी करतात की त्यांचे असे वागणे पाहून चाहत्यांचाही विनाकारण संताप होतो. 

'बिग बॉस' मराठी शोमुळे प्रकाशझोतात आलेली हिना पांचाळ सध्या अशाच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. लस घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये  हिना असे काही नखरे करत आहे की पाहून तिला इंजेक्शनचा किती त्रास झाला आणि किती नाही असाच प्रश्न पडला नाही तरच नवल. हिना पांचाळचा हा व्हिडीओ पाहून तिला नेटीझन्स ट्रोल करत आहेत. नेटीझन्स तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

''ओव्हर अ‍ॅक्टिंग की दुकान” , ''ओव्हर एक्टिंगचे ५० रु. कट करा'', इथे सर्वसामान्यांना लस घेण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. सेलिब्रेटींना संधी मिळाली तरी तिथेही बालिशपणे वागत इतरांचा वेळ वाया घालत असल्याचे टीका करताना दिसत आहेत. हिना पांचाळच नाही तर या आधीही अनेक सेलिब्रेटी लस घेताना असे नखरे करताना दिसले.प्रत्येकवेळी दिखावा करण्याची सेलिब्रेटींची सवय इथेही कायम आहे.

सेलिब्रेटींच्या अशा वागण्यावर अनेक कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री आशा नेगीने सेलिब्रेटींचा चांगलाच समाचार घेतला होता. व्हिडीओग्राफर स्वत: घेऊन जाता की रुग्णालयाकडून पुरवला जातो.” असं आशा म्हणाली आहे. आशाच्या या पोस्टवर अनेक टेलिव्हिजन कलाकारांनी कमेंट करत तिच्या पोस्टला पसंती दिली होती.लसीकरणाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्य़ा प्रत्येकासाठी, जागरुकतेसाठी ठीक आहे. पण कृपा करून इतकी ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका ते खूप त्रासदायक वाटतं” असं म्हणत आशाने व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर निशाणा साधत चांगलेच फटकराले होते.

टॅग्स :हिना पांचाळकोरोनाची लस