Join us

तो परत येतोय…! 'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये हार्दिक जोशीचं दमदार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 12:32 IST

Hardik Joshi's comeback in Tuzech Geet Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मल्हार आणि मोनिकाचे नाते निर्णायक वळणावर असताना मालिकेत पुन्हा एकदा अभिनेता हार्दिक जोशीची म्हणजेच शुभंकरची एण्ट्री होणार आहे.

अभिनेता हार्दीक जोशी (Hardik Joshi) मराठी सिनेइंडस्ट्रीतला लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने तुझ्यात जीव रंगला मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली राणादाची भूमिका घराघरात लोकप्रिय ठरली. त्यानंतर त्याने बऱ्याच मालिकेत काम केले. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील जाऊ बाई गावात या शोमध्ये काम करताना दिसत आहे. हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान आता लवकरच हार्दिक जोशी पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Geet Gaat Aahe) मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे. तर दुसरीकडे मोनिकासाठी सनी नावाच्या व्यक्तीने लिहिलेली प्रेम पत्र मल्हारच्या हाती लागणार आहे. त्यामुळे मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. 

मोनिकाच्या आयुष्यात पुन्हा नवीन वादळ मल्हार आणि मोनिकाचे नाते निर्णायक वळणावर असताना मालिकेत पुन्हा एकदा अभिनेता हार्दिक जोशीची म्हणजेच शुभंकरची एण्ट्री होणार आहे. मोनिकाला प्रेमपत्र लिहिणारा सनी म्हणजे स्वत: शुभंकर असल्याचा खुलासा तो करणार आहे. त्यामुळे शुभंकरच्या रुपात मोनिकाच्या आयुष्यात पुन्हा नवीन वादळ आले आहे. अडचणीच्या या परिस्थितीतून मोनिका कसा मार्ग काढणार? मल्हार मोनिकाला माफ करणार का? काय असेल मल्हार-मोनिकाच्या नात्याचे भविष्य हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. 

टॅग्स :हार्दिक जोशीस्टार प्रवाह