Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेचा फॅमिली फोटो पाहिलात का?, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:26 IST

Nilesh Sable : निलेश साबळेला चला हवा येऊ द्या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक असतात.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने अल्पावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या शोमधील कलाकार निलेश साबळे,  भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांनी आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. निलेश साबळे(Nilesh Sable)ला चला हवा येऊ द्या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. दरम्यान नुकतेच निलेश साबळेने फॅमिलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

निलेश साबळे याने होळीच्या निमित्ताने फॅमिली फोटो शेअर केला आहे. यात त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि लेकही आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, आला होळीचा सण लय भारी चल नाचूया… सर्वांना धूळवडीच्या खूप खूप शुभेच्छा..!!! त्याच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

निलेश हा आज अभिनेता असला तरी त्याने डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून त्याने आज अभिनेता, सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. निलेशने आयुर्वेदाची एम एसची पदवी घेतली असली तरी त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता. शिक्षण घेतल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. निलेशच्या करिअरसाठी गौरी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. गौरी साबळे देखील ग्रॅज्युएट असून तिचा सिनेइंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. निलेश आणि गौरीचा गेल्या ११ वर्षांपासून सुखी संसार सुरू आहे.

 

टॅग्स :निलेश साबळेचला हवा येऊ द्या