Join us

'थलायवा' सुनील शेट्टीला बघितलंत का! 'धारावी बॅंक' चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 19:53 IST

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी. धारावीतील गुन्हेगारी तर कायमच चर्चेचा विषय बनली आहे. याच विषयावर 'धारावी बॅंक' वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस येतीये.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी. धारावीतील गुन्हेगारी तर कायमच चर्चेचा विषय बनली आहे. याच विषयावर 'धारावी बॅंक' वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस येतीये. आजच याचा टीझर रिलीज झाला. अभिनेता सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांची मुख्य भुमिका असलेली धारावी बॅंक सिरीज एमएक्स प्लेयर या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात दोघेही अगदी दमदार लूकमध्ये दिसत आहेत. टीझरच्या सुरुवातीलाच सुनिल शेट्टी 'थलाएवा' या भुमिकेत दिसत आहे तर विवेक ओबेरॉय पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेत शोभून दिसतोय. या वेव सिरीजमध्ये दोन्ही अभिनेत्यांमध्ये चांगलीच टक्कर दिसून येतीये. 

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची चलती आहे. आश्रम, भौकाल सारख्या अनेक  सिरीज एमएक्सप्लेयरवर गाजल्या आहेत. आता धारावी बॅंक चा टीझर बघून याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असणार हे नक्की. 

टॅग्स :सुनील शेट्टी