Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया बापट व उमेश कामतचा रोमँटिक फोटो पाहिलात का?, पहा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 06:30 IST

प्रियाने उमेशसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्रिया आणि उमेशचा रोमाँटिक अंदाज पाहायला मिळतो आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अ‍ॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो, व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात. आपल्या खासगी जीवनातील बऱ्याच गोष्टीसुद्धा मनमोकळेपणाने दोघं इथं फॅन्ससह शेअर करतात. 

नुकताच प्रियाने उमेशसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्रिया आणि उमेशचा रोमाँटिक अंदाज पाहायला मिळतो आहे. प्रिया आणि उमेशच्या फॅन्सना त्यांचा हा रोमाँटिक फोटो खूपच आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव त्यांच्या फॅन्सनी या फोटोवर केला आहे.

दादा एक गुड न्युज आहे या नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशने निर्मिती श्रेत्रात पदार्पण केले आहे.

'आणि काय हवं' या वेबसिरीजमध्ये ही जोडी एकत्र झळकली होती. या 2013 साली 'टाईप प्लिज' सिनेमात उमेश आणि प्रिया एकत्र दिसले होते.

प्रेक्षकांना उमेश आणि प्रियाला स्क्रीनवर पाहायला खूप आवडते. याचे कारण म्हणजे त्यांच्यात असणारे प्रेम.

ते दोघे सोबत खूप सुंदर दिसतात आणि त्यांचे एकमेकांबद्दल असणारे प्रेम नेहमीच त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होत असते. 

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत