घाडगे सदनात नव्या संकाटाची चाहूल. कारण सौदामिनी नावाच्या पात्राची एन्ट्री लवकरच मालिकेत होणार आहे. तेव्हा सौदामिनी कडकडेच्या मालिकेत येण्याने मालिका कुठल्या वेगळ्या वळणावर येईल हे बघणे रंजक असणार आहे. हर्षदा खानविलकर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत मालिकेमध्ये दिसणार आहेत. सौदामिनी आणि घाडगे कुटुंबाचा काय संबंध आहे ? कियाराचा हा डाव तर नाही ना ? येत्या भागांमध्ये सौदामिनी घाडगेंना इंटरोगेट का करणार आहे ? सर्व घाडग्यांना सौदामिनी नजरकैदेत ठेवणार ? सौदामिनीला पुरुषांविषयी विशेष चीड आहे, त्यामुळे कियाराच्या खोट्या बोलण्यामध्ये येऊन ती अक्षय आणि घाडग्यांना जबाबदार धरणार का ? अमृता यामधून कशी मार्ग काढेल ?
हर्षदा खानविलकर 'या' मालिकेत दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 07:15 IST
घाडगे सदनात नव्या संकाटाची चाहूल. कारण सौदामिनी नावाच्या पात्राची एन्ट्री लवकरच मालिकेत होणार आहे.
हर्षदा खानविलकर 'या' मालिकेत दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत
ठळक मुद्दे हर्षदा खानविलकर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत मालिकेमध्ये दिसणार आहेत सर्व घाडग्यांना सौदामिनी नजरकैदेत ठेवणार ?