Join us

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामध्ये हा चिमुकला दिसला सांता क्लॉजच्या वेशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 07:15 IST

हर्षद सांता क्लॉज बनून मंचावर आनंद घेऊन आला. त्याला या वेशात पाहून सगळेच प्रचंड खूश झाले होते. यासोबतच सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाची देखील टीम आली होती

ठळक मुद्देहर्षदने सांता क्लॉज बनून छोटे सुरविरांना आणि कॅप्टन्सना पु.ल.देशपांडेची पुस्तकं दिली... खरं तर पु.ल.देशपांडे हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील सांता क्लॉज आहेतसांता क्लॉज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद घेऊन येतो... अगदी तसंच पु.ल. देखील त्यांच्या कार्यातून आपल्याला आनंद देतात... त्यांच्या लिखाणामुळे आपल्या आपल्या दु:खाचा विसर पडतो.

मुलांचा आवडता नातळ सण आता जवळ आला आहे... आणि आपल्या सगळ्यांचा आवडता सांता क्लॉज दरवर्षीप्रमाणे खूप आनंद घेऊन येणार आहे... आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा व्यक्ती असतो जो आपला सांता क्लॉज बनून आनंद घेऊन येतो... आपलं आयुष्य सुंदर बनवतो... पण क्रिसमसला आपण या सांता क्लॉजची विशेष करून वाट बघतो की, तो येईल आणि आपल्याला छानसे सरप्राईझ गिफ्ट मिळेल... कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामध्ये मुलांची सुंदर गाणी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे... आता कार्यक्रमामध्ये सहा फायनलिस्ट आहेत... मीरा, चैत्यन्य, सई, अंशिका, उत्कर्ष आणि स्वराली... सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामध्ये आता या सहा जणांमध्ये कोण विजेता ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार हे काहीच आठवड्यात सगळ्यांना कळणार आहे.

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामध्ये नेहमीच आपल्याला काही ना काही तरी नवीन पाहायला मिळते. आता नुकताच गोड सांता क्लॉज या कार्यक्रमामध्ये आला होता आणि त्याने छोट्या सुरवीरांना, कॅप्टन्सना खूप सारे गिफ्ट दिले... हा सांता क्लॉज दुसरा कोण नसून आपल्या सगळ्यांचा लाडका... ज्याने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले आहे असा मॉनिटर होता...

हर्षद सांता क्लॉज बनून मंचावर आनंद घेऊन आला. त्याला या वेशात पाहून सगळेच प्रचंड खूश झाले होते. यासोबतच सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाची देखील टीम आली होती... हर्षदने सांता क्लॉज बनून छोटे सुरविरांना आणि कॅप्टन्सना पु.ल.देशपांडेची पुस्तकं दिली... खरं तर पु.ल.देशपांडे हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील सांता क्लॉज आहेत... कारण सांता क्लॉज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद घेऊन येतो... अगदी तसंच पु.ल. देखील त्यांच्या कार्यातून आपल्याला आनंद देतात... त्यांच्या लिखाणामुळे आपल्या आपल्या दु:खाचा विसर पडतो...

टॅग्स :सूर नवा ध्यास नवा