Join us

Miss Universe 2021: हरनाज कौरवर शुभेच्छांचा वर्षाव; प्रियांका चोप्रा, लारा दत्तानं लिहिला विशेष संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 14:17 IST

अनेक स्तरांतून हरनाज कौरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“स्वत:वर विश्वास ठेवा, तुम्ही युनिक आहात आणि तीच तुमच्याकडे असलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे, हे कायम लक्षात ठेवा. दुसऱ्याशी तुलना करणे सोडा आणि जगभरात ज्या गोष्टी घडत आहेत त्यावर बोला. कोषातून बाहेर या आणि तुमच्यासाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या आयुष्याचे लिडर आहात. तुम्ही स्वत:चा आवाज बना. माझा स्वत:वर विश्वास आहे म्हणून आज मी याठिकाणी उभी आहे.” भारतीय मॉडेल असलेल्या हरनाज कौर सिंधू हीने ७० वा मिस युनिव्हर्स खिताब पटकावत भारतीयांची मान उंच केली आहे.सर्वप्रथम १९९४ मध्ये सुष्मिता सेनने भारताला हा बहुमान मिळवून दिला. लारा दत्ताने २००० साली हा खिताब जिंकला. त्यानंतर, आता २१ वर्षांनी हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हीनं ट्विटरवरुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. "आणि नवी मिस युनिव्हर्स आहे... मिस इंडिया. हरनाज कौरला शुभेच्छा, २१ वर्षांनंतर हा खिताब भारतात आला आहे," असं म्हणत तिनं शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे लारा दत्तानंही तिला शुभेच्छा दिल्या. "हरनाजला शुभेच्छा. क्लबमध्ये तुझं स्वागत आहे. गेल्या २१ वर्षांपासून याची वाट पाहत आहोत. आम्हाला आज अभिमान वाटतोय. लाखो स्वप्न साकार झाली आहे," असं ती म्हणाली.  अवघ्या २१ वर्षांची असलेली हरनाज पंजाबमधील चंदीगडची आहे. ती आता पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याआधी तिने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. हरनाजने नुकताच मिस दिवा मिस युनिव्हर्स २०२१ हा खिताब पटकावला होता. तर २०१९ मध्ये फेमिना मिस इंडिया पंजाब हा खिताबही तिने पटकावला होता. तिने आतापर्यंत अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले असून तिला आताच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत मेक्सिकोची अँड्रिया मेझा हिने हरनाजच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सच्या मुकुट घातला.

टॅग्स :मिस युनिव्हर्सप्रियंका चोप्रालारा दत्ता