Join us

'गॉन गेम' वेबसिरीजमध्ये झाली हरलीन सेठीची एंट्री, साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 16:20 IST

अभिनेत्री हरलीन सेठीची 'गॉन गेम'मध्ये एंट्री झाली  आहे.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आलेल्या असंख्य अडचणींना तोंड देत  गॉन गेम या मर्डर मिस्ट्री वेबसिरीजचे चित्रिकरण केले होते. संजय कपूर, अर्जून माथूर, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी शर्मा यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. या बेवसिरीजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

 संजय कपूर, अर्जून माथूर, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी शर्मा, रुखसार रेहमान, लुब्ना सलीम आणि दिब्येंन्दू भट्टाचार्य हे पहिल्या भागात असलेले मूळ कलाकार नव्या सीझनमध्येही परतणार आहेत, पण त्याचबरोबर अभिनेत्री हरलीन सेठीची आता  यात एंट्री झाली  आहे. हरलीन यात  सीबीआय ऑफिसर शर्मिला संगमा ही भूमिका साकारणार आहे.

 गॉन गेमबाबत हरलीन सेठी म्हणाली, “मी पहिला सीझन पाहिला होता, त्यामुळे या मालिकेच्या झगमगत्या कलाकारांच्या यादीत दाखल होण्याची आणि एका खंबीर सीबीआय ऑफिसरचे- शर्मिलाचे पात्र साकारण्याचा प्रस्ताव मी झटकन स्वीकारलाा. तिची तल्लख बुद्धी आणि गुन्ह्याचा मागोवा घेण्याची शिस्तबद्ध पद्धत यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक भावनिक पैलू मिळवून देते आणि प्रेक्षक या पात्राशी समरस होतात. हे पात्र साकारण्यासाठी आणि ‘न्यू नॉर्मल’च्या या काळात एखादा गुन्हेगारी तपास कसा उलगडतो हे मांडण्यास मी अतिशय उत्सुक आहे. लॉक़ाडाऊन पॅनडेमिकच्या सर्व शक्यतांचा कळस पहिल्या सीझनमध्ये गाठला गेला होता आणि दुस-या सीझनमध्ये कथेतील रहस्य अधिकच उंचीला पोहोचेल याची मला खात्री आहे. या मालिकेचे काम सुरू करण्यासाठी आम्ही सगळेच अधीर आहोत. “

टॅग्स :हरलीन सेठी