Join us
Daily Top 2Weekly Top 5

दु:खातून सावरत असलेल्या राणादाने बदलला त्याचा लूक, पाहा त्याचा नवा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 10:20 IST

‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले यांच्या निधनामुळे हार्दिक जोशी दु:खी झाला होता.

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. आता हि मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खबर म्हणजे आता त्यांचा लाडका राणा पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षक पाहू शकतील कि राणा नोकरी किंवा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करायचं ठरवणार आहे आणि अंजली देखील त्याच्या या निर्णयात त्याला साथ देणार आहे. राणा त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करतो आणि नोकरीच्या शोधात असलेल्या राणाला स्पोर्ट्स कोट्यातून पोलिस भरतीची माहिती कळते. राणा तिथे भरती होऊन ट्रेनिंग घेणार आहे. या मालिकेतील त्याच्या या नव्या भूमिकेबद्दल बोलताना राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, "तुझ्यात जीव रंगला या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे आणि म्हणूनच राणा पोलिसमध्ये भरती व्हायचा निर्णय घेतो. प्रेक्षकांनी जस राणावर प्रेम केलं तसंच राणाचा हा नवीन प्रवास देखील पाहायण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील."

 

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले यांच्या निधनामुळे हार्दिक जोशी दु:खी झाला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

टॅग्स :हार्दिक जोशीतुझ्यात जीव रंगला