Join us
Daily Top 2Weekly Top 5

अफेअर्स, २ लग्न आणि लेकीसोबत लिपकिस; करिअरपेक्षा महेश भट्ट यांचं खासगी आयुष्यच चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 17:52 IST

महेश भट्ट यांचं जितकं फिल्मी करिअर गाजलं त्यापेक्षा कैकपटीने त्यांची पर्सनल लाइफ चर्चिली गेली.

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. महेश भट्ट यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. महेश भट्ट यांचं जितकं फिल्मी करिअर गाजलं त्यापेक्षा कैकपटीने त्यांची पर्सनल लाइफ चर्चिली गेली. किंबहुना अजूनही त्यांच्या वैयक्तिक जीवनाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते. 

महेश भट्ट यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण, एक वेळ अशी होती जेव्हा त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील आणि विनोद खन्ना यांचे ते सेक्रेटरी होते. महेश भट्ट यांनी शालेय दिवसांपासून कामाला सुरुवात केली होती. वयाच्या 20 व्या वर्षी महेश यांनी जाहिरातींसाठी लिहायला सुरुवात केली.  ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील आणि विनोद खन्ना यांचे सचिव म्हणूनही त्यांना काम करावे लागले.  वयाच्या 26 व्या वर्षी महेश भट्ट यांनी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली आणि येथून त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली.

महेश भट्ट यांचं लव्ह लाइफही अतिशय रंजक आहे.  कॉलेजमध्ये असताना महेश भट्ट हे लॉरियन ब्राइट नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले. लग्नानंतर लॉरियनचे नाव बदलून किरण भट्ट ठेवले.  किरण आणि महेश भट्ट या जोडीला पूजा भट्ट आणि राहुल भट्ट अशी दोन मुले आहेत. यानंतर परवीन बाबीच्या प्रेमात पडले तिच्यासोबत  लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र, काही काळानंतर त्यांचे परवीनसोबतचे संबंधही बिघडले आणि दोघांचं नातं तुटलं.  महेश भट्ट आणि परवीन बाबी यांच्यातील नातेसंबंधही बॉलीवूडमध्ये बराच काळ चर्चेचा विषय होता. 

त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर लॉरियनचे नाव बदलून किरण भट्ट ठेवण्यात आले. दरम्यान, महेश भट्ट यांचे परवीन बॉबीसोबत देखील अफेअर होते. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला होता. त्यावेळी महेश भट्ट विवाहित होते. 1977मध्ये त्यांनी परवीन बाबीवरील प्रेम व्यक्त केले होते. विवाहित असूनही महेश भट्ट यांनी पत्नीला दूर करून परवीनसोबत लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांचे परवीनसोबतचे संबंधही बिघडले. याला कारण ठरला परवीन बाबी यांचा आजार.

 विवाहित असूनही, जेव्हा ते चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री सोनी राजदानला भेटले, तेव्हा त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. सोनी राजदानला काही काळ डेट केल्यानंतर त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि सोनी राजदानसोबत दुसरे लग्न केले. या लग्नापासून आलिया आणि शाहीन या दोन मुली आहेत.

दुसरे लग्न आणि चार मुले झाल्यानंतरही महेश भट्ट यांचे अफेअर थांबले नाही. चित्रपटाच्या सेटवर काही अभिनेत्रींसोबत त्याची जवळीक वाढत असल्याच्या बातम्या नेहमीच येत होत्या. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसोबतच महेश भट्ट यांचेही नाव चांगलेच चर्चेत आले होते. शिवाय, लेक पूजा भट्ट हिच्यासोबत लीपलॉक केल्याचा फोटो एका मासिकावर झळकला होता. या प्रकरणामुळे महेश भट्ट यांना आजही ट्रोल केले जाते.  

टॅग्स :महेश भटआलिया भटपूजा भटबॉलिवूड