Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy 4th Wedding Anniversary: मृण्मयी देशपांडेने रोमँटीक अंदाजात दिल्या नव-याला शुभेच्छा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 13:23 IST

3 डिसेंबर 2016 रोजी व्यावसायिक स्वप्निल रावसह मृण्मयी रेशीमगाठीत अडकली होती. मृण्मयीच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस आहे. सध्या मृण्मयी आणि स्वप्नील गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहेत.

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वोत्तम आणि अनुरुप जोडी समजली जाते. दोघंही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात शिवाय दोघांचं एकमेकांशी चांगलंच पटतं. मराठी चित्रपटसृष्टीतील ही जोडी सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टमधून ती पोस्ट पाहणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना दोघं काही ना काही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देत असतात. 

3 डिसेंबर 2016 रोजी व्यावसायिक स्वप्निल रावसह मृण्मयी रेशीमगाठीत अडकली होती. मृण्मयीच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस आहे. सध्या मृण्मयी आणि स्वप्नील गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहेत. नुकतंच मृण्मयीने पतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.मृण्मयी-स्वप्नीलचे आहे अरेंज्ड मॅरेज आहे.

विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात मृण्मयी आणि स्वप्नील यांचा पेहरावसुद्धा तितकाच खास होता. आकर्षक साडीमध्ये नवराई मृण्मयीचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते.  त्यांच्या लग्नापूर्वी मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. पण स्वप्निलला पाहिल्यानंतर लग्न, घर, सुख काय असतं हे समजलं असे मृण्मयी सांगते.

मृण्मयी स्वप्निलच्या वडिलांची पहिली पसंती होती. स्वप्नातील सून मिळाली असे सांगत त्यांनी स्वप्निलला तिला भेटण्यास सांगितले होते.मृण्मयी सून म्हणून त्यांच्या घरात यावी यासाठी स्वप्निलचे वडील फारच उत्सुक होते. ती फारच सुंदर आहे, ती फार चांगल्या कुटुंबातील आहे तू तिला एकदा भेटायलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले.

स्वप्निलनेही एकदा भेटायला काय हरकत आहे असा विचार करत होकार दिला आणि त्यांनी एकमेंकांचे नंबर घेतले आणि एकमेकांशी संवाद साधायला सुरूवात केली. काही दिवस फोनवलर बोलल्यानंतर स्वप्निल आणि मृण्मयी यांनी भेटायचे ठरवले.

भेटल्यानंतर दोघांच्याही आवडी- निवडी जुळल्या आणि लग्नाचा दोघांनीही निर्णय घेतला. या कपलच्या सुखी संसाराला आता ४ र्ष पूर्ण झालं आहे. लग्नाच्या वाढदिवसाला तुमचा सुखी संसार असाच सुरु राहो याच मृण्मयी- स्वप्निलला शुभेच्छा.

टॅग्स :मृण्मयी देशपांडे