Join us  

Hansika Motwani Wedding : ‘साऊथ ब्युटी’ हंसिका मोटवानीनं बांधली लग्नगाठ; पाहा, नववधूचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 10:21 AM

Hansika Motwani Wedding : अखेर प्रतीक्षा संपली. साऊथची ब्युटी हंसिका मोटवानी अखेर लग्नबंधनात अडकली. 4 डिसेंबरला हंसिकाने तिचा बॉयफ्रेन्ड सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधली.

Hansika Motwani Wedding : अखेर प्रतीक्षा संपली. साऊथची ब्युटी हंसिका मोटवानी (Hansika Motwani ) अखेर लग्नबंधनात अडकली. 4 डिसेंबरला हंसिकाने तिचा बॉयफ्रेन्ड सोहेल कथुरियासोबत (Sohael Kathuriya) लग्नगाठ बांधली. जयपूरच्या मुंडोता फोर्टमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. हंसिका आणि सोहेलने सप्तपदी घेतलेला किल्ला 450 वर्ष जुना आहे. हंसिकाच्या लग्नासाठी किल्ला खास सजावण्यात आला होता. केवळ आतूनच नव्हे तर बाहेरूनही हा किल्ला पाहण्यासारखा आहे. हंसिका आणि सोहेलने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांनी या पॅलेसवर डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं होतं. लग्नानंतर वधूच्या पोशाखातील हंसिकाचा पहिला फोटो समोर आला आहे.

हंसिकाने लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. पण सोशल मीडियावर हंसिकाच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्नात हंसिका कमालीची सुंदर दिसतेय. तिने लाल रंगाचा लहंगा घातलेला आहे. यावर साजेसे दागिने, लाल चुडा असा तिचा लुक आहे.

मंडपात हंसिकाची शानदार एन्ट्री, वरमाला, सप्तपदी असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईत पारंपरिक पूजेअर्चेसह हंसिका व सुहेलच्या लग्नविधींना सुरूवात झाली होती. यानंतर मेहंदी, हळद, संगीत सेरेमनी रंगली. या प्रत्येक सेरेमनीत हंसिका भाव खाऊन गेली.

हंसिका मोटवानी साऊथची लोकप्रिय  अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. शक लाका बूम बूम,  सास भी कभी बहू थी आणि  सोन परी यांसारख्या गाजलेल्या मालिकांत हंसिकाने काम केलं आहे.

या मालिकांच्या माध्यमातून हंसिका घराघरांत पोहोचली आहे.  कोई मिल गया, आपका सरूर  आणि मनी है तो हनी यांसारख्या बॉलिवूड सिनेमांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

2007 साली हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’ या सिनेमात हंसिका झळकली आणि तिला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. कारण काय तर त्यावेळी हंसिकाचं वय होतं केवळ 16 वर्षे आणि चित्रपटात ती वयापेक्षा कितीतरी मोठी दिसली होती. त्याआधी 2003 मध्ये ‘कोई मिल गया’ या सिनेमात ती बालकलाकार म्हणून दिसली होती आणि चारच वर्षांनी ‘आपका सुरूर’मध्ये ती लीड हिरोईन होती.

‘कोई मिल गया’मधली बालकलाकार अचानक इतकी मोठी झालेली पाहून सर्वच हैराण झाले होते.  यावरून  वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. लवकर मोठं होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचं याकाळात बोललं गेलं होतं.  

टॅग्स :हंसिका मोटवानीTollywoodबॉलिवूड