Join us
Daily Top 2Weekly Top 5

गली बॉय फेम सिद्धांत चर्तुवेदी सांगतोय हा क्षण आहे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 17:55 IST

गली बॉय या चित्रपटातील एमसी शेर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही भूमिका सिद्धांत चर्तुवेदीने साकारली आहे. सिद्धांतने या चित्रपटाच्या आधी इनसाइड एज या वेबसिरिजमध्ये काम केले होते.

ठळक मुद्देसिद्धांतने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो नुकताच शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्या हातात एक फुलांचा गुच्छ आणि एक पत्र दिसत आहे. या दोन्ही गोष्टी अमिताभ बच्चन यांनी सिद्धांतला पाठवल्या आहेत. सिद्धांतला या भेटवस्तू मिळताच त्याने इन्स्टाग्रामद्वारे अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या अभिनयाने सजलेल्या ‘गली बॉय’ने बॉक्स ऑफिसवर शानदार यश मिळवले. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आणि आठव्या दिवशी थेट १०० कोटींवर मुसंडी मारली. ‘गली बॉय’ आता शंभर कोटी क्लबमध्ये सामील झाला असून या चित्रपटातील रणवीर, आलिया यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटामुळे आणखी एक नाव चर्चेत आले आहे.

गली बॉय या चित्रपटातील एमसी शेर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही भूमिका सिद्धांत चर्तुवेदीने साकारली आहे. सिद्धांतने या चित्रपटाच्या आधी इनसाइड एज या वेबसिरिजमध्ये काम केले होते. त्याच्या या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. गल्ली बॉय हा त्याचा पहिलाच चित्रपट असून सिद्धांतने त्याच्या पहिल्याच चित्रपटात सिक्सर मारला आहे. या चित्रपटामुळे त्याच्या फॅन्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या तर सिद्धांत प्रचंड खुश आहे. कारण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सिद्धांतच्या अभिनयाचे फॅन झाले असून त्यांनी त्याचे कौतुक करण्यासाठी त्याला एक पत्र लिहिले आहे. 

सिद्धांतनेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्याने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो नुकताच शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्या हातात एक फुलांचा गुच्छ आणि एक पत्र दिसत आहे. या दोन्ही गोष्टी अमिताभ बच्चन यांनी सिद्धांतला पाठवल्या आहेत. सिद्धांतला या भेटवस्तू मिळताच त्याने इन्स्टाग्रामद्वारे अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले आहे की, सादर प्रणाम, तुम्ही दिलेली भेटवस्तू आणि तुमचे आशीर्वाद मला मिळाले. मला तुमची अशाप्रकारे दाद मिळेल याचा मी कधी विचार देखील केला नव्हता. मला आज जो आनंद झाला आहे, तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. तुमच्या पाया पडण्याचा योग मला कधी येईल याची मी आतुरतेने वाट पाहात आहे. 

 

टॅग्स :गली ब्वॉयअमिताभ बच्चन