Join us

गोविंदाचा मॅनेजर आहे जिवंत! मग कोणाच्या निधनावर रडला अभिनेता?, लोकांचा उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:59 IST

Govinda's Manager Sashi Sinha Alive: गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा आहेत जिवंत. खुद्द त्यांनीच निधनाच्या वृत्तावर मौन सोडत अफवा फेटाळून लावली आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Actor Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा विभक्त होत असल्याच्या अफवांनी काही दिवसांपूर्वी उधाण आणलं होतं. या अफवांना पूर्णविराम लागल्यानंतर आता गोविंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओत गोविंदा कोणाच्या तरी अंतिम संस्करावेळी रडताना दिसतो आहे. बऱ्याच मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा (Sashi Sinha) यांचे निधन झाले आहे. त्यांच्याच अंतिम संस्कारात अभिनेता सहभागी झाला होता. त्यावेळी रडतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र आता हे वृत्त अफवा असल्याचे समजते आहे. शशी सिन्हा जिवंत आहेत.

IANSच्या रिपोर्टनुसार, गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा 'फिट अँड फाईन' असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. IANS कडे शशी सिन्हा यांनी त्यांच्या निधनाच्या अफवा फेटाळून लावल्या आणि म्हणाले, "माझ्या मृत्यूची खोटी बातमी पसरल्यापासून मला माझ्या फोनवर अनेक शोक संदेश आणि कॉल येत आहेत."

एक्स मॅनेजर आणि सध्याच्या मॅनेजरचं नाव सारखंचशशी सिन्हा पुढे म्हणाले की, गोविंदाचे एक्स मॅनेजर आणि जवळचे मित्र शशी प्रभू यांचे (Sashi Prabhu) निधन झाले आहे, त्यांचे नाही. ते पुढे म्हणाले, माझे नाव गोविंदाचा जुना मित्र आणि एक्स मॅनेजर शशी प्रभू यांच्याशी मिळतेजुळते असल्याने हा गोंधळ उडाला अन् माझ्या निधनाचे खोटे वृत्त सगळीकडे पसरले.  इल्झाम सिनेमाच्या वेळी शशी प्रभू त्यांचे मॅनेजर होते, या सिनेमानंतर मी हे काम पाहत आहे.

शशी प्रभू गोविंदाला होते भावासारखेशशी सिन्हा पुढे म्हणाले, "शशी प्रभूजी गोविंदाच्या खूप जवळचे होते आणि ते त्यांच्या भावासारखे होते." शशी सिन्हा गेली अनेक वर्षे गोविंदाचे काम सांभाळत आहेत आणि त्याची व्यावसायिक कारकीर्द घडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शशी हे आमिर खान, आयेशा झुल्का आणि संगीता बिजलानी यांसारख्या अनेक बॉलिवूडसेलिब्रिटींचे मॅनेजर राहिले आहेत. गेल्या आठवड्यात शशी सिन्हा यांनी सुनीता आहुजा आणि गोविंदाच्या विभक्त होण्याच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. 

टॅग्स :गोविंदाव्हायरल फोटोज्बॉलिवूडसेलिब्रिटीव्हायरल व्हिडिओमृत्यू