Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:18 IST

सुनिता आहुजा चाहत्यांना म्हणाल्या, 'पॅनिक होऊ नका, महिनाभरानंतर...'

अभिनेता गोविंदासोबत (Govinda) काल दुर्घटना घडली. त्याच्याच परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी झाडली गेली जी त्याच्या पायाला लागली. यानंतर त्याला तातडीने अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी गोळी काढली. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणार आहे. आता नुकतंच गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

सुनिता आहुजा यांनी गोविंदाच्या तब्येतीतबाबत अपडेट दिले. त्या म्हणाल्या,   "सरांची तब्येत आता ठीक आहे. आज त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील. आता तब्येतीत सुधार आहे. मला वाटतं दोन दिवसात त्यांना डिस्चार्जही मिळेल. सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते आता ठीक आहेत. मंदिर, दर्गा सगळीकडे पूजा प्रार्थना सुरु आहे. त्यांचे इतके चाहते आहेत. चाहत्यांना हेच सांगेन की पॅनिक होऊ नका.  त्यामुळे ते आता एकदम ठणठणीत आहेत. महिनाभरानंतर ते डान्सही करायला लागतील."

गोविंदा काल कोलकत्याला जाण्यासाठी पहाटेच निघणार होता. तेव्हाच पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ताज्या माहितीनुसार, गोविंदाची परवाना असलेली बंदूक पोलिसांनी सील केली आहे. तसंच जुहू पोलीस याचा तपासही करत आहेत. हा केवळ अपघात होता ज्यातून गोविंदाचे प्राण वाचले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर गोविंदाने काल ऑडिओ क्लिप शेअर करत सर्व चाहत्यांचे आभार मानले. तसंच आपण एकदम ठणठणीत असल्याचीही माहिती दिली होती. 

टॅग्स :गोविंदाबॉलिवूडपरिवारहॉस्पिटल