Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चाँदनी'मध्ये दिसला असता गोविंदा, व्हीलचेअरच्या सीनमुळे नाकारला सिनेमा? 'गदर'ही केला रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 10:37 IST

गोविंदाने त्याच्या करिअरमध्ये जितके हिट सिनेमे दिले त्यापेक्षा अनेक चित्रपट नाकारले देखील होते.

बॉलिवूडमध्ये आपल्या विनोदी अभिनयाने आणि उत्तम डान्सने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे गोविंदा (Govinda). गोविंदाने बराच काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. 'हिरो नंबर १','कुली नंबर १','आखियो से गोली मारे' असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले. तेव्हा एकटा गोविंदा तिन्ही खान ला टक्कर द्यायचा. इतकंच नाही तर त्याने 'गदर' आणि 'देवदास' सारखे सुपरहिट सिनेमेही नाकारले होते.

गोविंदाने त्याच्या करिअरमध्ये जितके हिट सिनेमे दिले त्यापेक्षा अनेक चित्रपट नाकारले देखील होते. त्याने नाकारलेले कित्येक चित्रपट सुपरहिट झाले होते. ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांचा सुपरहिट सिनेमा 'चाँदनी' आधी गोविंदाला ऑफर झाला होता. यातील ऋषी कपूरची भूमिका त्याला साकारायला मिळणार होती. मात्र सिनेमात ऋषी कपूरचे कॅरेक्टर व्हीलचेअरवर जाते हे गोविंदाला मान्य नव्हतं म्हणून त्याने ऑफर नाकारली.

इतकंच नाही तर 'ताल' सिनेमातील अनिल कपूरच्या भूमिकेसाठी आधी गोविंदाला विचारण्यात आलं होतं. शिवाय 'गदर'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सिनेमाची स्क्रिप्ट आधी गोविंदाला ऐकवली होती. मात्र खूप हिंसा असल्याने आणि राजकीय वाद नको म्हणून गोविंदाने सिनेमा करण्यास नकार दिला होता. संजय लीला भन्साळींच्या ब्लॉकबस्टर 'देवदास' सिनेमात जॅकी श्रॉफने साकारलेली 'चुन्नी बाबू'ची भूमिकाही गोविंदाला ऑफर झाली होती. मात्र सहकलाकाराची भूमिका करण्यास तेव्हा गोविंदा तयार झाला नाही. 

गोविंदाला 'चीची' नावाने हाक मारतात. सध्या तो फारसा सिनेमात दिसत नसला तरी त्याची क्रेझ कायम आहे. एका वर्षात १० सिनेमे देणाऱ्या गोविंदाने भल्या भल्या अभिनेत्यांना टक्कर दिली होती.

टॅग्स :गोविंदाबॉलिवूडसिनेमा