Join us

गोविंदाच्या सेक्रेटरीचं निधन, अंत्यसंस्काराला हमसून हमसून रडला अभिनेता, भावुक करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:10 IST

Govinda’s Secretary Shashi Prabhu Death: शशी प्रभू हे केवळ गोविंदाचे सेक्रेटरी नव्हते तर त्यांच्यात मैत्रीपूर्ण आणि घरच्यासारखे संबंध होते. म्हणूनच मित्रासारख्या आपल्या सेक्रेटरीला अखेरचा निरोप देताना गोविंदालाही अश्रू अनावर झाले.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा सेक्रेटरी शशी प्रभू यांचं गुरुवारी(६ मार्च) निधन झालं. त्यांच्या निधनाने गोविंदाला मोठा धक्का बसला आहे. शशी प्रभू हे केवळ गोविंदाचे सेक्रेटरी नव्हते तर त्यांच्यात मैत्रीपूर्ण आणि घरच्यासारखे संबंध होते. म्हणूनच मित्रासारख्या आपल्या सेक्रेटरीला अखेरचा निरोप देताना गोविंदालाही अश्रू अनावर झाले. 

शशी प्रभू यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला गोविंदाने हजेरी लावली होती. सेक्रेटरीला अखेरचा निरोप देताना अभिनेत्याला भरुन आलं होतं. गोविंदाचे डोळे पाणावले होते. शशी प्रभू यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेता भावुक झाला होता. याचा व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत गोविंदाच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत. 

शशी प्रभू यांच्या पार्थिवावर रात्री १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. गोविंदाने सेक्रेटरीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वनही केलं. गोविंदाचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत. 

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटीमृत्यूबॉलिवूड