उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. नव्या वर्षात ती नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}अभिनेत्री प्रिया बापट एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे. पुढिल महिन्यात सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे.
याबाबत प्रिया बापट म्हणाली, हा माझा पहिलाच इंग्रजी चित्रपट आहे. परदेशात चित्रित होणाराही हा माझा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी माझ्या कुठल्याही मराठी वा हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात झालेले नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. सध्या व्हिसा आणि इतर गोष्टींची तयारी मी करते. ऑडिशनमध्ये मला आठ दृश्य द्यावी लागली. त्यामुळे माझी निवड होण्यापूर्वीच मी कुठे तरी या भूमिकेशी जोडली गेले. आदित्यने निवड होण्यापूर्वीच कथा सगळ्या कलाकारांच्या हाती दिली. माझी निवड झाली याचा मला आनंद आहे.' प्रिया बापटचे चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.