Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया बापटच्या चाहत्यांसाठी खुशखबर..! 'सिटी ऑफ ड्रीम्स २' लवकरच येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 12:40 IST

अभिनेत्री प्रिया बापट लवकरच सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट लवकरच सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापटने २०१९मध्ये सिटी ऑफ ड्रीम्सच्या पहिल्या सीझनमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केले होते. या वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेचेही कौतुक झाले होते. याच वेब सीरिजचा दुसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियाने नुकतेच या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

प्रिया बापटने इंस्टाग्रामवर  सिटी ऑफ ड्बसिरीजच्या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, अखेर शूटिंग पूर्ण. सिटी ऑफ ड्रीम्स सीझन २, लवकरच तुमच्या भेटीला. मागील बऱ्याच दिवसांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. फायनली आमचे शूटिंग पूर्ण झाले. मी संपूर्ण टीमचे आभार मानते. मला या टीमसोबत काम करायला मिळाले याबदद्ल मला खूप अभिमान वाटतो. लवकरच हा दुसरा सीझन तुमच्या भेटीला येणार, अशा शब्दांमध्ये तिने ही भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.

प्रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये या वेबसिरीजची टीम या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे सेलिब्रेशन करताना पहायला मिळतेय. प्रियाच्या या व्हिडिओचे चाहत्यांनीही कौतुक केले आहे, सोबतच तिच्या या वेब सीरिजच्या रिलीजचीही उत्सुकता त्यांना लागली आहे.

सिटी ऑफ ड्रीम्स ही वेब सीरिज क्राईम पॉलिटिकल ड्रामा आहे. पहिल्या सीझनमध्ये या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या वेबसिरीजमधील प्रियाच्या लेस्बियन किसिंग सीनचीही बरीच चर्चा झाली होती. यामुळे प्रियाला ट्रोलिंगलासुद्धा सामोरे जावे लागले होते, प्रियानेही या ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले होते. प्रियाने यामध्ये पूर्णिमा गायकवाड नावाच्या एका राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली होती.

नागेश कुकुनूर यांनी पहिल्या सीझनचे दिग्दर्शन केले होते. आता या दुसऱ्या सीझनचेही दिग्दर्शन त्यांनीच केले आहे. पहिल्या सीझनमध्ये राजकीय अधिकारासाठी एका बहीण-भावाचा संघर्ष दाखवण्यात आला होता. यासोबतच या वेब सीरिजमध्ये लिंगभेदाचा मुद्दाही मांडण्यात आला होता. 

टॅग्स :प्रिया बापटनागेश कुक्कनूर