Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीती चोप्राचा 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा टीझर आऊट, नेटफ्लिक्सवर या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 16:22 IST

परिणीती चोप्राचा आगामी सिनेमा 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा टीझर आऊट झाला आहे.

परिणीती चोप्राचा आगामी सिनेमा 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमाची वाट चाहते मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. अखेर टीझरसोबत सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. परिणीती चोप्राचा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.  26 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

या सिनेमात परिणीती एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. यात ती एक अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. ती एका घटस्फोटित महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. यावेळी परिणीती चोप्रा वेगळ्या अंदाजात दिसते आहे.  परिणीती आतापर्यंत रोमँटिक ड्रामा चित्रपटात अधिक दिसली होती, पण आता ती  थ्रिलरमध्ये सिनेमात दिसणार. परिणीती चोप्राच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन'ची झलक छोटी आहे पण दमदार आहे.

 

 टीझरमध्ये परिणीती ट्रेनमध्ये फिरताना   एखाद्याचा शोध घेताना दिसते आहे, ज्यामध्ये तिला कधीकधी संकटाला देखील सामोरे जावे लागते. या चित्रपटात अभिनेत्री एका अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारणार आहे. तिच्यासमवेत अदिती राव हैदरी, कृती कुल्हारी आणि अविनाश तिवारी असतील.  'द गर्ल ऑन द ट्रेन' मिस्ट्री-थ्रिलर सिनेमा आहे. हा याच नावाने आलेल्या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे.   

टॅग्स :परिणीती चोप्रा