कर्जत : नामवंत अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. बंगळुरू शहरात जरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असला तरी त्यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथे झाला होता. त्यामुळे माथेरानशी त्यांचे अनोखे ऋणानुबंध जोडले गेले होते.पूर्वी माथेरानमध्ये येणारे पर्यटक किंवा लोक महिनोंमहिने वास्तव्यास असायचे. गिरीश कर्नाड यांचे कुटुंबदेखील त्या वेळेस येथे वास्तव्यास असताना गिरीश यांचा जन्म माथेरानमधील बी. जे. रुग्णालयात झाला. कर्नाड यांच्या जन्माची नोंद आजही नगरपालिकेच्या दफ्तरात आहे. त्यामुळे आज त्यांच्या जाण्याने माथेरानकरदेखील हळवे झाले आहेत.१९ मे १९३८ साली माथेरानच्या बी. जे. रुग्णालयात गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला. नगरपालिकेत १९३८ सालच्या जन्म नोंदबुकात त्याची नोंद आहे. २००२ साली मी नियोजन सभापती असताना बी. जे. हॉस्पिटलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना आमंत्रित करण्याचा मानस होता पण काही कारणास्तव तो कार्यक्रम होऊ शकला नाही; आणि गिरीश कर्नाड यांना माथेरानमध्ये आणण्याचे स्वप्न भंगले.- राजेश चौधरी, तत्कालीन नियोजन सभापती, माथेरान नगर परिषद
माथेरानमध्ये झाला होता गिरीश कर्नाड यांचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 06:37 IST