Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ghooskhor Pandat Controversy: रिलीजआधीच 'घूसखोर पंडित' सिनेमा अडकला वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:56 IST

मनोज वाजपेयी यांच्या आगामी वेबसीरिजच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या सीरिजच्या नावावरून निर्माण झालेल्या वादामुळे आता कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या आगामी वेबसीरिजच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या सीरिजच्या नावावरून निर्माण झालेल्या वादामुळे आता कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमका वाद? मनोज वाजपेयी यांच्या या नवीन वेब सीरिजचे नाव 'घूसखोर पंडित' (Ghooskhor Pandat) असे ठेवण्यात आले आहे. या नावामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'पंडित' या शब्दासोबत 'घूसखोर' (लाचखोर) हा शब्द जोडणे अपमानजनक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या नावामुळे समाजाची प्रतिमा मलिन होत असून लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लखनऊमध्ये गुन्हा दाखल या वादाची दखल घेत लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ब्राह्मण महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी सिनेमाच्या या शीर्षकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेब सीरिजचे निर्माते, दिग्दर्शक आणि संबंधित व्यक्तींविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

वेब सीरिजच्या घोषणेनंतर सोशल मीडियावरही विरोधाचा सूर पाहायला मिळत आहे. युजर्सनी निर्मात्यांना हे नाव बदलण्याची विनंती केली असून सीरिजवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. मनोज वाजपेयी यांच्यासारख्या प्रतिभावान अभिनेत्याने अशा शीर्षकाच्या प्रोजेक्टमध्ये काम करू नये, असेही काही चाहत्यांचे मत आहे. अद्याप या प्रकरणावर निर्माते किंवा मनोज वाजपेयी यांच्याकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, वाढता वाद पाहता वेब सीरिजचे नाव बदलले जाणार की कायदेशीर लढा दिला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Ghooskhor Pandit' web series faces controversy over title, FIR filed.

Web Summary : Manoj Bajpayee's upcoming web series 'Ghooskhor Pandit' is embroiled in controversy. An FIR has been filed in Lucknow following allegations that the title, which translates to 'Corrupt Pandit,' hurts the sentiments of the Brahmin community. Protests and calls for a boycott have emerged online.
टॅग्स :मनोज वाजपेयीनेटफ्लिक्सबॉलिवूड