Join us
Daily Top 2Weekly Top 5

घाडगे & सून फेम भाग्यश्री लिमयेला भेटल्यानंतर प्रेक्षकांच्या असतात अशा प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 18:30 IST

​घाडगे & सून या मालिकेतील भाग्यश्री साकारत असलेली अमृता ही भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडत आहे की, प्रेक्षक तिच्या भूमिकेच्या प्रेमातच पडले आहेत.

ठळक मुद्देभाग्यश्री सांगते, मी जेव्हा जेव्हा लोकांना भेटते, तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात अमृताबद्दल प्रेम दिसते... एकदा एका बसमध्ये एक बाई VOOT वर घाडगे & सून ही मालिका बघत होत्या. अचानक त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्या आनंदाने ओरडल्या तू अमृताच ना! त्यांनी मला मिठी मारली.

​घाडगे & सून या मालिकेद्वारे भाग्यश्री लिमयेने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ही तिची पहिलीच मालिका असली तरी या मालिकेत ती साकारत असलेली अमृता ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत चिन्मय उद्गीरकर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. चिन्मय आणि तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावत असून या मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले असून भाग्यश्री ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे. 

​घाडगे & सून या मालिकेतील भाग्यश्री साकारत असलेली अमृता ही भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडत आहे की, प्रेक्षक तिच्या भूमिकेच्या प्रेमातच पडले आहेत. याविषयी भाग्यश्री सांगते, मी जेव्हा जेव्हा लोकांना भेटते, तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात अमृताबद्दल प्रेम दिसते... एकदा एका बसमध्ये एक बाई VOOT वर घाडगे & सून ही मालिका बघत होत्या. अचानक त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्या आनंदाने ओरडल्या तू अमृताच ना! त्यांनी मला मिठी मारली “किती सुंदर काम करतेस” असं म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर थोपटलं... तो क्षण मी कधीच विसरणार नाही. 

भाग्यश्रीला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. तिचे हे स्वप्न २०१७ मध्ये पूर्ण झाले. याविषयी ती सांगते, अभिनेत्री बनण्याचा प्रवास हा माझ्यासाठी सोपा नव्हता. या क्षेत्रात कोणीही गॉडफादर नसल्याने या क्षेत्रात स्थिरावणे हे माझ्यासाठी खूप कठीण होते. अभिनयक्षेत्रात येण्याचा प्रयत्न करत असताना मला अनेकवेळा अपयश आलं. अपयश आलं की मी लगेचच खचून जाते, ते माझ्या स्वभावातच आहे. पण माझ्या या स्वभावाला मुरड घालून यशस्वी होण्यासाठी मी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. मी ऑडिशन देतच राहिले. अनेकवेळा मला ऑडिशनमध्ये रिजेक्ट करण्यात आले. पण आलेल्या अपयशाने खचून न जाता मी अधिक उत्साहाने पुढची ऑडिशन्स देत राहिली आणि त्यामुळेच मला यश मिळाले. मी घेतलेल्या मेहनतीमुळेच मला घाडगे & सून या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझी ही भूमिका प्रेक्षकांना देखील आवडत आहे याचा मला प्रचंड आनंद होत आहे.

 

 

टॅग्स :घाडगे अँड सूनभाग्यश्री लिमेय