Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पहाटे ५ वाजता उठून...', निवेदिता सराफ यांना पावसाळ्यात आवडतं करायला 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 09:51 IST

Nivedita Saraf : निवेदिता सराफ सध्या भाग्य दिले तू मला या मालिकेत पाहायला मिळत आहेत.

मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी चित्रपट आणि मालिका या माध्यमातून रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत काम करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या मालिकेला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. निवेदिता सराफ सोशल मीडियावर सक्रीय असून त्या या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान त्यांनी एका मुलाखतीत पावसाळ्यात त्यांना काय करायला आवडते, याबद्दल सांगितले.

निवेदिता सराफ यांना पावसाळा खूप आवडतो. त्या सांगतात की, मुंबईत पावासामुळे चिखल होतो. त्यामुळे मला पाऊस घरात बसून खिडकीतून बघायला आवडतो. पण पूर्वी मी जेव्हा रनिंग करायचे तेव्हा आमचा एक ग्रुप होता रन इंडिया रन. मी पाच वर्ष मॅरेथॉनमध्ये धावले आहे. त्यावेळी मी पहाटे पाच वाजता उठायचे आणि रनिंगसाठी जूहू बीचवर जायचे. पावसात पळण्याची मजा काही औरच आहे. जेव्हा मी पावसात पळायचे तेव्हा खूप छान वाटायचे.

वर्कफ्रंट

निवेदिता सराफ सध्या भाग्य दिले तू मला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. निवेदिता यांनी 'ये जो है जिंदगी','केसरी नंदन','सपनो से भरे नैना' या हिंदी मालिकांमध्ये काळ काम केलं होतं.तर 'किंग अंकल', 'सर आँखो पर', 'जायदाद' यासारख्या काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या. सध्या निवेदिता सराफ 'वाडा चिरेबंदी' या नाटकात बिझी असल्यामुळे मालिकांमधून ब्रेक घेतला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :निवेदिता सराफ