Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रूप तेरा मस्ताना' गाण्यातील दिलखेचक अदांनी जॉर्जिया अँड्रियानीने सर्वांना केले घायाळ, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 18:52 IST

जॉर्जिया अँड्रियानीचे रुप तेरा मस्ताना हे रिमिक्स व्हर्जन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीचे रुप तेरा मस्ताना हे रिमिक्स व्हर्जन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. हे मूळ गाणे किशोर कुमार यांनी गायले आहे. या गाण्यात अभिनेत्री  शर्मिला टागोर आणि दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना पहायला मिळाले होते. हे मूळ गाणे १९६९ साली आराधना चित्रपटात चित्रित करण्यात आले होते. रूप तेरा मस्तानाचे रीमिक्स व्हर्जन गायक मिका सिंग आणि मानवी खोसलाने रेकॉर्ड केले आहे. 

या गाण्याबद्दल बोलताना जॉर्जिया म्हणाली, " मी युरोपमध्ये मॉडेल असताना बऱ्याच क्लबमध्ये गाण्याचे रिमिक्स्ड व्हर्जन प्ले करायचे आणि मग मी एक दिवस हे गाणे स्वतःच तपासून पाहण्याचा निर्णय घेतला. शर्मिला टागोर यांनी इतक्या सन्मानाने गाण्यात आणलेली कामुक भावना मला अनुकरण करण्याची इच्छा होती. मला माहित नव्हते की एक दिवस मिका मला आवडलेल्या गाण्यांचा भाग होण्यासाठी माझ्याकडे येईल."

श्रेयस तळपदे, संजय मिश्रा आणि तिग्मांशू धुलिया अभिनीत ‘वेलकम टू बजरंगपूर’ या सिनेमातून जॉर्जिया अँड्रियानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय अरबाज खान आणि प्रिया प्रकाश वॉरियर अभिनीत बहुप्रतिक्षित 'श्रीदेवी बंगलो' चित्रपटात ती आयटम नंबर करतानाही दिसली आहे.

मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे. दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतात.

जॉर्जिया अरबाज पेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. वयात इतकं अंतर असताना ही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघ एकत्र स्पॉट झाले आहेत.

जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे.

टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खानमिका सिंग