Join us
Daily Top 2Weekly Top 5

 ‘गीता मां’च्या आयुष्यात कुणीतरी ‘खास’? जाणून घ्या कोण आहे हा ‘मिस्ट्री बॉय’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 14:04 IST

होय, 48 वर्षांच्या Geeta Kapoorच्या आयुष्यात एका खास व्यक्तिची एन्ट्री झाल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीये. होय, सोशल मीडियावर गीताचे एका मिस्ट्री बॉयसोबतचे फोटो नव्याने व्हायरल होत आहेत

छोट्या पडद्यावर गीता मां या नावाने प्रसिध्द असलेली कोरियोग्राफर गीता कपूर  (Geeta Kapoor)) तूर्तास  एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, 48 वर्षांच्या गीताच्या आयुष्यात एका खास व्यक्तिची एन्ट्री झाल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीये. होय, सोशल मीडियावर गीताचे एका मिस्ट्री बॉयसोबतचे फोटो नव्याने व्हायरल होत आहेत आणि फोटोतील हा मिस्ट्री बॉय कथितरित्या गीताचा बॉयफ्रेन्ड असल्याचा दावा केला जातोय.

रिपोर्टनुसार, गीतासोबत फोटोत दिसणा-या ‘मिस्ट्री बॉय’चे नाव  राजीव खिंची आहे. तो  असिस्टंट डायरेक्टर असून काही चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं मानलं जातंय. तशी गीता व राजीव खिंची यांच्या अफेअरची चर्चा आजची नाही. याआधीही अनेकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या.

अद्याप गीताने याबाबत काहीही खुलासा केलेला नाही.  त्यामुळे या व्हायरल फोटोमागची कहाणी अद्याप तरी समोर आलेली नाही. पण तूर्तास या फोटोंची जोरदार चर्चा आहे.  

गीताने वयाच्या अवघ्या 15 वर्षी फराह खानचा ग्रुप जॉइन केला होता. यानंतर तिने फराहसोबत कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम,  मोहब्बते, कल हो न हो, 'ओम शांति ओम  सोबतच अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट म्हणून काम केले. ऐवढेच नाही तर तिने चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केलेय. गीताने   फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, तीस मार खां आणि तेरे नाल लव हो गया सारख्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे.

यासोबतच  टीव्हीवर डांस इंडिया डांस,  डीआईडी लिल चँप्स्स  आणि इंडियाज डांसिंग सुपरस्टार या शोजची ती जज आहे.

टॅग्स :गीता कपूर