Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे'मधील ईशा उर्फ गायत्री दातारने सांगितला फिटनेस फंडा, जाणून घ्या तिचे 'हे' सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 15:52 IST

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं.

ठळक मुद्दे गायत्री दातार हिने अगदी कमी वेळातच लोकप्रियतेचे शिखर गाठले

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेतील ईशाची प्रमुख भूमिका निभावणारी अभिनेत्री गायत्री दातार हिने अगदी कमी वेळातच लोकप्रियतेचे शिखर गाठले. खऱ्या आयुष्यात गायत्री स्वतः खूप ऍडव्हेंचरस आहे.

लहानपणापासूनच ती जिम्नॅस्टिक स्टेट लेव्हल, बास्केट बॉल, रॉक क्लायंबिंग अशा वेगवेगळ्या ऍडव्हेंचरस स्पोर्ट्समध्ये भाग घेत असे. तिला ट्रेकिंगची तसेच फिरायची खूप आवड आहे. तिने माऊंटनरिंगचा कोर्स सुद्धा केला आहे. घरचा सात्विक आहार घेणे, जंक फूड टाळणे याची सवय तिला आधीपासूनच आहे. थोडक्यात काय तर गायत्री आपल्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही.

तुला पाहते रे या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे गायत्रीला नियमितपणे स्पोर्ट्सकडे लक्ष देता येत नाही आहे आणि म्हणूनच तिने तिच्या फिटनेससाठी व्यायामशाळा लावली. चित्रीकरणात कितीही व्यस्त असली तरीही गायत्री सकाळचा व्यायाम गायत्री चुकवत नाही. रोज सकाळी ६ वाजता उठून गायत्री व्यायाम करते आणि दिवसाची सुरुवात करते. १२ - १४ तास शूटिंग केल्यानंतर व्यायामासाठी सकाळी उठणे खूप कठीण आहे पण गायत्रीचे असं म्हणणं आहे की शूटिंगसाठी घरापासून दूर असल्यामुळे घरचं जेवण होत नाही आणि बाहेरच अनहेल्दी खाणं खाल्लं जातं त्यामुळे शरीराला शिस्त लागणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी व्यायाम केलाच पाहिजे. बारीक होण्यापेक्षा फिट राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे असं गायत्रीचे मत आहे.   

टॅग्स :तुला पाहते रेगायत्री दातार