'बिग बॉस ७'ची विजेती अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली. पाच वर्षांपूर्वीच गौहर जैद दरबारसोबत निकाह केला होता. तर २०२३ साली तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. तिला गोंडस मुलगा झाला. तर आता लेकाच्या जन्मानंतर दोन वर्षात गौहर दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी गौहर आणि जैद आतुर आहेत.
गौहर खानने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती पची जैदसोबत एका व्हायरल गाण्यावर डायलॉग्स बोलतेय आणि डान्स करतेय. नंतर जैद गौहरच्या बेबी बंपवर हात ठेवतो. अशा पद्धतीने दोघंही गुडन्यूज रिव्हील करतात. गौहरने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले,"तुमच्या प्रेमाची आणि प्रार्थनेची गरज आहे. बेबी २..."
गौहरच्या या पोस्टवर चाहते आणि इतर कलाकार कमेंट करत प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. लॉकडाऊनमध्ये गौहर आणि जैद यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. जैदने तिला सुपरमार्केटमध्ये पाहिलं होतं. तिथेच तो तिच्या प्रेमात पडला. त्याने लगेच तिला मनातील भावना सांगितल्या. दोघं इन्स्टाग्रामवर बोलायला लागले. त्यांच्यात मैत्री झाली, मग ते प्रेमात पडले.
यापूर्वी कॉमेडी क्वीन भारती सिंह, अभिनेत्री अनिता हसनंदानी यांनीही मुलाला जन्म दिला होता. भारती सिंहनेही दुसऱ्यांदा आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर अभिनेत्री इशिता दत्तानेही दीड वर्षांपूर्वी मुलाला जन्म दिला होता. आता ती पुन्हा प्रेग्नंट आहे.