Join us  

Gauahar Khan:वयाच्या ४० व्या वर्षी अभिनेत्री गौहर खान झाली आई, पोस्ट करत म्हणाली “आनंदाचा खरा अर्थ काय…”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 11:47 AM

गौहर खानने बुधवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

अभिनेत्री गौहर खान आई झाली आहे. 10 मे रोजी तिने एक गोंडस बाळाला जन्म दिला. याची माहिती गौहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, विक्रांत मेस्सी आणि मृणाल ठाकूर यांसारख्या सेलिब्रिटींनी गौहरला आई झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेग्नेंसीची घोषणाही तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे केली होती. त्यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना बाळासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.  

गौहरने एक ग्राफिक व्हिडिओ शेअर केला होता. “आम्हाला मुलगा झाला आहे. सलाम ऊ अलैकुम, या सुंदर जगात तुझे स्वागत. १० मे २०२३ ला आम्हाला आमच्या आनंदाचा खरा अर्थ काय हे कळले. आम्हाला मुलगा झाला आहे. तुमचे प्रेम आणि प्रार्थनेबद्दल आभार. कृतज्ञ आणि नवीन पालक झैद आणि गौहर”, असे तिने यात लिहिले आहे.

गौहर आणि जैद यांच्या वयातील १२ वर्षांच्या फरकामुळे त्यावेळी लग्न चर्चेत आले होते. कपलची लव्हस्टोरी चित्रपटापेक्षा कमी नव्हती.

गौहर आणि जैदची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. लॉकडाऊन दरम्यान घरातील ग्रॉसरी खरेदी करताना दोघे एका दुकानात भेटले होते. गौहरने जैदला स्टोअरमध्ये पाहिले नाही. यानंतर जैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आणि दोघेही बोलू लागले. हळूहळू मैत्री झाली आणि तिचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले.  लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलंय.

'इशकजादे', 'रॉकेट सिंग', 'बेगम जान', 'तांडव', 'बेस्टसेलर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' यासह अनेक लोकप्रिय चित्रपट आणि वेब सिरीज आहेत. 'गेम' सारख्या चित्रपटात तिनं आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे. गौहर खानने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. 

टॅग्स :गौहर खान