Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्‍हारा दिमाग खराब है?, प्रेग्नेंट असल्याची बातमी वाचून भडकली गौहर खान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 16:58 IST

गौहर खान सोशल मीडियावर चांगलीच वैतागली आहे.

गौहर खान सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातून जात आहे. 5 फेब्रुवारी रोजी तिच्या वडिलांचे निधन झाले. या दु:खातून गौहर अजून सावरली देखील नाही त्याच दरम्यान सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली की लग्नाच्या तीन महिन्यानंतर गौहर खान प्रेग्नेंट आहे. या चर्चेवर गौहर चांगलीच वैतागली आहे. तिने ट्विटरवर लोकांना 'संवेदनशील' होण्याचा सल्ला दिला आहे.   

गौहर खानने बुधवारी दुपारी ट्विटरवर बातमी शेअर करताना लिहिले की, 'तुमचं डोकं फिरलं आहे! आणि तथ्य देखील. 12 वर्ष लहान ही बातमी चुकीची आहे, काहीही टाइप करण्यापूर्वी आधी तथ्ये तपासून घ्या! मी नुकताच माझ्या वडिलांना गमावला आहे, म्हणून आपल्या निराधार रिपोर्टबाबत थोडेसे संवेदनशील व्हा. मी प्रेग्नेंट नाही. धन्यवाद. '

जाणून क्या आहे प्रकरणजैदने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या सुरुवातील तो ‘कोई आ रहा है,’ असे जैद म्हणतो आणि यानंतर त्याच्या फॅमिली मेंबर्सची शॉकिंग रिअ‍ॅक्शन येते. ‘हे कन्फर्म आहे. आमच्यासोबत एक नवा अतरंगज जोडला जाणार आहे. सर्वांच्या शॉकिंग रिअ‍ॅक्शन पाहून काय वाटतेय? कोण असू शकतं? कमेंटमध्ये सांगा,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना जैदने लिहिले. काही चाहत्यांनी तर अगदी छातीठोकपणे गौहर प्रेग्नंट आहे, तुम्हाला बेबी होणार आहे, अशा कमेंट्स करत गौहर व जैदला शुभेच्छा देणे सुरु केले.

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो ‘बिग बॉस’च्या 7 व्या सीझनची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन आॅफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले. विद्या बालनच्या ‘ बेगम जान’ या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :गौहर खान